मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : विराट कोहली शून्यावर आऊट होताच त्याला पोलिसांनी केलं ट्रोल, Tweet Viral

IND vs ENG : विराट कोहली शून्यावर आऊट होताच त्याला पोलिसांनी केलं ट्रोल, Tweet Viral

विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर आऊट होताच त्याला उत्तराखंड पोलिसांनी (Uttarakhand police) ट्रोल केले आहे.

विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर आऊट होताच त्याला उत्तराखंड पोलिसांनी (Uttarakhand police) ट्रोल केले आहे.

विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर आऊट होताच त्याला उत्तराखंड पोलिसांनी (Uttarakhand police) ट्रोल केले आहे.

अहमदाबाद, 13 मार्च : इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकणाऱ्या भारतीय टीमची (Team India) टी20 सीरिजमधील सुरुवात चांगली झाली आहे. भारताला इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) पहिल्या टी20 मध्ये मोठा पराभव सहन करावा लागला. भारतीय बॅट्समन्सने या मॅचमध्ये निराशा केली. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) तर शून्यावर आऊट झाला. या अपयशाबद्दल त्याला सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच ट्रोल केले जात आहे. उत्तराखंड पोलिसांनीही (Uttarakhand police) कोहलीला त्याच्या या अपयशाबद्दल ट्रोल केले आहे. त्यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.

पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या भारतीय टीमची सुरूवात खराब झाली. केएल राहुलला एक रनवर जोफ्रा आर्चरने बोल्ड केलं, तर कर्णधार विराट कोहली  पाच बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला. लेग स्पिनर आदिल रशीदने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा शून्य रनवर आऊट झाला.

याआधी चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही त्याला खातं उघडता आलं नव्हतं. करियरमध्ये पहिल्यांदाच विराटवर ही नामुष्की ओढवली. तर दुसरीकडे कर्णधार म्हणून विराट 14 व्यांदा शून्यवर आऊट झाला. हे नकोसं रेकॉर्डही विराटच्या नावावर झालं. याआधी सौरव गांगुली कर्णधार असताना 13 वेळा शून्यवर आऊट झाला होता.

उत्तराखंड पोलिसांनी या अपयशाबद्दल विराटला ट्रोल केले आहे. 'फक्त हेल्मेट घालणे पुरेसे नाही. तर संपूर्ण सावधपणे गाडी चालवली पाहिजे, अन्यथा तुम्ही शून्यावर आऊट होऊ शकता असे ट्विट उत्तराखंड पोलिसांनी केले आहे.

उत्तराखंड पोलिसांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे. काही युजर्सनी त्यांच्यावर याबद्दल टीका केली आहे.

पहिल्या टी20 मध्ये प्रमुख बॅट्समन्सच्या अपयशामुळे भारतीय टीमला 7 आऊट 124 इतकेच रन करता आले. भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वात जास्त 67 रन काढले. 125 रनचे आव्हान इंग्लंडने फक्त 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह पाच मॅचच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

First published:
top videos

    Tags: India vs england, Police action, Social media viral, Uttarakhand, Viral post, Virat kohli