मुंबई, 30 मे: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी इन्स्टाग्रामवर क्रिकेट फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विराट कोहलीसाठी हे वर्ष खास आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात तो बाबा बनला. विराट आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli -Anushka Sharma) यांच्या मुलीचं नाव वामिका (Vamika) असून तिचा अजून एकही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. शनिवारी झालेल्या इन्स्टाग्राम सेशनमध्ये विराटला याच विषयावर क्रिकेट फॅन्सनी प्रश्न विचारला होता. काय होता प्रश्न? विराट कोहलीला फॅन्सनी प्रश्न विचारला की, ‘वामिका या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? मी तिचा फोटो पाहू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना विराटनं सर्वप्रथम वामिका या नावाचा अर्थ समाजवून सांगितला. वामिका हे दूर्गा देवीचं नाव असल्याचं विराटने सांगितलं. त्यानंतर तिच्या फोटो बद्दलच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले. " तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे." असे विराटने सांगितले.
पापाराझ्झींना केली होती विनंती वामिकाचा जन्म 11 जानेवारी रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही दिवसांनी विराट आणि अनुष्कानं पापारझ्झींना (Paparazzi) पत्र लिहून कृपया आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती केली होती. क्रिकेटमधले सगळे विक्रम नावावर, तरी सचिनला आहे या गोष्टीची खंत ‘एक पालक म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आणि पाठिंब्याची नितांत गरज असल्याचे या त्यांनी पत्रात म्हटले होते. आम्ही योग्यवेळी तुम्हाला कण्टेंट उपलब्ध करुन देऊ अशी हमी या दांपत्याने छायाचित्रकारांना दिली. आमच्यावरील चित्रणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच पुरवू. त्यामुळे सध्या तुम्ही आमच्या बाळाच्या अनुषंगाने असलेला कोणाताही कटेंट घेऊ नये.’ असे आवाहन त्यांनी केले होते.