मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटमधले सगळे विक्रम नावावर, तरी सचिनला आहे या गोष्टीची खंत

क्रिकेटमधले सगळे विक्रम नावावर, तरी सचिनला आहे या गोष्टीची खंत

क्रिकेटचे सगळे विक्रम स्वत:च्या नावावर असणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने क्रिकेटच्या मैदानावरचीच त्याची एक खंत बोलून दाखवली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : क्रिकेटचे सगळे विक्रम स्वत:च्या नावावर असणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने क्रिकेटच्या मैदानावरचीच त्याची एक खंत बोलून दाखवली आहे. 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने 100 शतकं, 200 टेस्ट मॅच, 463 वनडे आणि 34 हजार रन केले. या काळात सचिन वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू ठरला. वनडेमध्ये त्याने 18,463 रन केले, यात 49 शतकं आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. जवळपास अडीच दशकं सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केलं. टेस्ट क्रिकेटमध्येही त्याने 15,921 रन, 51 शतकं आणि 68 अर्धशतकं केली.

सचिन टीममध्ये असताना भारताने वर्ल्ड कप जिंकला, तसंच टीम इंडिया टेस्टमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचली, पण तरीही सचिनने त्याच्या करियरमधली एक खंत बोलून दाखवली.

मला सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि व्हिव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांच्यासोबत खेळता आलं नसल्याचं दु:ख आहे, असं सचिन म्हणाला. 'गावसकर माझे लहानपणीचे हिरो होते, त्यांच्याबरोबर मला खेळायला मिळालं नाही, याचं अजूनही वाईट वाटतं. माझं पदार्पण व्हायच्या दोन र्ष आधीच त्यांनी निवृत्ती घेतली. तसंच मला माझ्या आणखी एक हिरो असलेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याविरुद्धही खेळता आलं नाही. काऊंटी क्रिकेटमध्ये मी त्यांच्याविरुद्ध खेळलो, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्याविरुद्ध खेळायला मिळालं नाही, याचा खेद वाटतो. रिचर्ड्स यांनी 1991 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी मी दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलो, तरी त्यांच्याविरुद्ध खेळायची संधी मिळाली नाही,' असं सचिन म्हणाला. 2013 साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

First published:

Tags: Cricket news, Sachin tendulkar