Home /News /sport /

टीम इंडियाच्या भावी कोचला रवी शास्त्रींचा गंभीर इशारा, पद सोडण्यापूर्वी म्हणाले...

टीम इंडियाच्या भावी कोचला रवी शास्त्रींचा गंभीर इशारा, पद सोडण्यापूर्वी म्हणाले...

आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी संपणार आहे. ही मुदत संपण्यापूर्वी शास्त्रींनी नव्या कोचला गंभीर इशारा दिला आहे.

    मुंबई, 18 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीमचे (Indian Cricket Team) मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. भारत-इंग्लंड सीरिजमधील (India vs England Test Series 2021) मँचेस्टरमध्ये होणारी शेवटची टेस्ट कोरोनामुळे रद्द झाली. त्यासाठी ब्रिटीश मीडिया आणि फॅन्सनी रवी शास्त्रींना जबाबदार ठरवलं. शास्त्रींनी लंडनमध्ये त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी संपणार आहे. त्यानंतर आपल्याला मुदतवाढ नको असल्याचं त्यांनी बीसीसीआला (BCCI) कळवलं आहे. शास्त्रींची मुदत संपण्यास आता दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यावेळी नव्या कोचला गंभीर इशारा दिला आहे. शास्त्री यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीयांच्या क्रिकेट वेडाबद्दल सांगितलं आहे. 'कोव्हिड असो वा नसो त्यांना काही पर्वा नसते. त्यांची नेहमी तुम्ही जिंकावं आणि भरपूर रन करावे अशी अपेक्षा असते. भारतीय क्रिकेट टीमचा कोच होणं हे ब्राझील किंना इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा कोच होण्यासारखं आहे. तुम्ही नेहमी बंदुकीच्या टोकावर असता. 6 महिने चांगलं खेळल्यानंतर 36 रनवर ऑल ऑऊट झाल्यास ते तुम्हाला गोळी मारतील. त्यानंतर तुम्हाला लगेच जिंकावं लागेल.  माझ्यावर या प्रकारच्या टिकेचा काही परिणाम होत नाही,' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विराट कोहलीला BCCI देणार आणखी एक धक्का, सर्वात मोठा 'शत्रू' येणार परत वर्ल्ड कपनंतर सोडणार पद टी20 वर्ल्ड कपनंतर पद सोडण्याची योग्य वेळ असल्याचं शास्त्रींनी स्पष्ट केले. 'मला हवं ते मी सर्व मिळवलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 म्हणून पाच वर्ष राहणे, ऑस्ट्रेलियात दोनदा तर इंग्लंडमध्ये एकदा विजय, हे सर्व माझ्या 40 वर्षांच्या क्रिकेट करिअरमधील सर्वात आनंदाचे क्षण आहेत.' असं  त्यांनी सांगितलं. रवी शास्त्रींनी फेटाळली BCCI ची विनंती, टीम इंडियाला मिळणार नवा हेड कोच रवी शास्त्रींची 2017 साली टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कालावधीमध्ये भारतीय टीमला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. आगमी टी20 वर्ल्ड कप ही त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ravi shastri

    पुढील बातम्या