जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी: 'विराट कोहली 'या' कारणांमुळे कॅप्टनसी सोडणार', रवी शास्त्रींचा दावा

मोठी बातमी: 'विराट कोहली 'या' कारणांमुळे कॅप्टनसी सोडणार', रवी शास्त्रींचा दावा

मोठी बातमी: 'विराट कोहली 'या' कारणांमुळे कॅप्टनसी सोडणार', रवी शास्त्रींचा दावा

विराट कोहली (Virat Kohli) आता टेस्ट आणि वन-डे फॉर्मेटमधील कॅप्टनसी देखील सोडणार आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) हा दावा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 नोव्हेंबर : क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आता टेस्ट आणि वन-डे फॉर्मेटमधील कॅप्टनसी देखील सोडणार आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) हा दावा केला आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर (T20 World Cup 2021) रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपला आहे. तसंच विराट कोहलीनं टी20 प्रकारातील कॅप्टनसी या स्पर्धेनंतर सोडली असून त्याच्या जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. विराट कोहली वर्क लोड मॅनेजमेंटसाठी अन्य फॉर्मेटमधील कॅप्टनसी देखील सोडणार का? असा प्रश्न शास्त्रींना ‘इंडिया टूडे’ मधील मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना शास्त्रींनी सांगितलं की, ‘टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या कॅप्टनसीखाली टीम इंडिया गेल्या 5 वर्षांपासून अव्वल क्रमांकावर आहे. त्याला मानसिक थकवा येईपर्यंत तो कॅप्टनसी करेल. त्यानंतर तो हे पद सोडेल. विराट लवकरच बॅटींगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनसी सोडू शकतो,’ असा दावा शास्त्रींनी केला आहे. ‘ही गोष्ट लगेच होणार नाही, पण असं होऊ शकतं. तो वन-डे टीमची कॅप्टनसी सोडून फक्त टेस्ट टीमच्या कॅप्टनसीवरही लक्ष केंद्रीत करू शकतो. अनेक यशस्वी क्रिकेटपटूंनी बॅटींगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनसी सोडली आहे,’ याची आठवण देखील शास्त्रींनी यावेळी करुन दिली. ‘विराट कोहलीमध्ये चांगला खेळ करण्याची इच्छा आहे. तो टीममधील सर्वात जास्त फिट खेळाडू आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. तुम्ही शारीरिक फिट असाल तर जास्त काळ क्रिकेट खेळू शकता. कॅप्टनसीबीाबत तो निर्णय घेईल. पण तो वन-डे क्रिकेटची कॅप्टनसी लवकरच सोडू शकतो. त्यानं टेस्ट टीमची कॅप्टनसी पुढील काळातही करावी. तो टेस्ट क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ अ‍ॅम्बेसेडर आहे.’ असं शास्त्रींनी सांगितलं. विराट कोहलीसह अन्य खेळाडू देखील बायो-बबलमुळे येणारा थकवा घालवण्यासाठी दीर्घ काळ ब्रेक घेऊ शकतात, असा अंदाज शास्त्रींनी व्यक्त केला. त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये नवा कॅप्टन असणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडूंवरील दबाव कमी होईल. अनेक खेळाडूंना ब्रेक घेण्याची इच्छा आहे. सतत खेळत असल्यानं त्यांना विश्रांती आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. IND vs NZ : अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कॅप्टन, मुंबईच्या दमदार खेळाडूचं टेस्ट टीममध्ये पदार्पण टीम इंडियातील खेळाडू देशापेक्षा आयपीएलला महत्त्व देतात, या कपिल देव यांच्या आरोपावर शास्त्रींनी सांगितलं की,‘एप्रिल महिन्यात कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बीसीसीआयकडं अन्य पर्याय नव्हता. भविष्यात असं होईल असं मला वाटक नाही. आयपीएलमुळे खेळाडूंचा थकवा वाढला, हे कपिल देव यांचं मत योग्य आहे,’ हे शास्त्रींनी मान्य केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात