जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Under 19 WC : विराट कोहलीनं फायनलपूर्वी दिला तरूण खेळाडूंना 'गुरू-मंत्र'

Under 19 WC : विराट कोहलीनं फायनलपूर्वी दिला तरूण खेळाडूंना 'गुरू-मंत्र'

Under 19 WC : विराट कोहलीनं फायनलपूर्वी दिला तरूण खेळाडूंना 'गुरू-मंत्र'

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आठव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची (Under-19 World Cup-2022) फायनल गाठली आहे. शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारतीय टीमची लढत इंग्लंडशी होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आठव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची (Under-19 World Cup-2022) फायनल गाठली आहे. शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारतीय टीमची लढत इंग्लंडशी होणार आहे. या लढतीपूर्वी टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) तरूण क्रिकेटपटूंशी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. तसंच त्यांना फायनलसाठी काही टिप्स दिल्या. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 2008 साली अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवले आहे. अंडर 19 टीमचे सदस्य कौशल तांबे आणि राजवर्धन हंगरगेकर यांनी विराटसोबतच्या चर्चेचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. ‘विराट भैय्याशी चर्चा करणे हा चांगला अनुभव होता. त्याच्याकडून क्रिकेट तसंच आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या गोष्टींचा आगामी काळात उपयोग होईल.’ अशी भावना राजवर्धननं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्यक्त केली आहे. तर, ‘सर्वात महान खेळाडू GOAT कडून फायनलपूर्वी महत्त्वाच्या टिप्स’ असं कॅप्शन कौशलनं दिलं आहे. भारतीय टीमनं सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 रननं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2 आऊट 37 असा स्कोर होता त्यावेळी यश मैदानात उतरला होता. तो खेळण्यासाठी आला त्यावेळी टीम इंडियावर दबाव होता. या दबावात यशनं भक्कम मानसिकतेनं खेळ करत शतक झळकावले. त्याने 110 बॉलमध्ये 110 रन काढले. यशच्या शतकामुळे टीम इंडियानं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 290 रन केले. IND vs WI : टीम इंडियात आक्रमक ओपनरची एन्ट्री, पहिल्याच मॅचमध्ये केली होती कमाल 291 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 41.5 ओव्हरमध्ये 194 रन ऑलआऊट झाली.भारताकडून विकी ओस्तवालनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी कुमार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 2 तर कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात