मुंबई, 4 फेब्रुवारी : वेस्ट इंडिज विरूद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी (India vs West Indies) टीम इंडियानं सराव सुरू केला आहे. भारतीय खेळाडूंची गुरूवारी पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आणखी कोणत्या नव्या खेळाडूला कोरोनाची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड या तिघांचे रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्येच ठेवण्यात येणार आहे. हे तिघेही वन-डे मालिकेतून जवळपास आऊट झाले आहेत. भारतीय टीममधील ओपनरना कोरोनाची लागण झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मयांक अग्रवालचा (Mayank Agarwal) टीममध्ये समावेश करण्यात आलाय. पण त्याचा 3 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी रविवारी मॅचच्या दिवशीच संपणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून इशान किशनचा (Ishan Kishan) वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या इशान किशनचा यापूर्वी टी20 टीममध्ये समावेश करण्यात आला होता. आता एक स्पेशालिस्ट बॅटर म्हणून त्याची वन-डे टीममध्येही निवड करण्यात आली आहे. इशाननं मागच्या वर्षी श्रीलंका विरूद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी पदार्पणातील मॅचमध्येच त्याने 42 बॉलमध्ये 59 रनची आक्रमक खेळी केली होती. विराट कोहलीचा जोडीदार म्हणून 3 जणांवर RCB ची नजर, मोठी बोली लावण्याची तयारी इशाननं आजवर टीम इंडियाकडून 2 वन-डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 30 च्या सरासरीनं 60 रन काढले आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 76 इनिंगमध्ये 37 च्या सरासरीनं 2609 रन काढले आहे. 4 शतक आणि 13 अर्धशतकाच्या मदतीने त्याने हे रन केले आहेत. त्याचा या प्रकारातील स्ट्राईक रेट 92 आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यापासून पहिल्यांदाच वन-डे सामना खेळणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिकेत तो दुखापतीमुळे जाऊ शकला नव्हता. केएल राहुलच्या कॅप्टनसीमध्ये झालेल्या त्या मालिकेत टीम इंडियाचा 0-3 या फरकाने पराभव झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







