Home /News /sport /

विराट कोहलीचा न्यूझीलंडमध्ये अपमान, गळ्यात टाकला पट्टा! पाहा Photo

विराट कोहलीचा न्यूझीलंडमध्ये अपमान, गळ्यात टाकला पट्टा! पाहा Photo

न्यूझीलंडच्या एका वेबसाईटनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) अपमान केला आहे.

    मुंबई, 25 जून : न्यूझीलंडचे क्रिकेटपटू खेळ भावना जपण्यासाठी आणि शांत वृत्तीसाठी ओळखले जातात. मैदानातील वर्तणुकीबद्दल अनेकदा त्यांचे उदाहरण दिले जाते. त्याचवेळी न्यूझीलंडच्या एका वेबसाईटनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) अपमान केला आहे. न्यूझीलंडमधील स्पोर्ट्स वेबसाईट TheAccNZ याने एक फोटो प्रसिद्ध केला आहे. तो पाहून क्रिकेट फॅन्समध्ये संतापाचं वातावरण आहे. TheAccNZ वेबसाईटनं त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये एक महिलेनं माणसाच्या गाळ्यात पट्टा टाकला आहे. फोटोमधील महिलेला काईल जेमिसन (Kyle Jamieson) हे नाव देण्यात आले असून ज्याच्या गळ्यात पट्टा आहे, त्या व्यक्तीला विराटचं नाव देण्यात आलं आहे. विराटची या फोटोतून आक्षेपार्ह पद्धतीनं टिंगल करण्यात आली आहे. जेमिसननं केलं होतं विराटला आऊट काइल जेमिसननं फायनल टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये विराट कोहलीला आऊट केले होते. त्यानंतर TheAccNZ ने हा फोटो प्रसिद्ध केला आहे. फायनलमधील पहिल्या इनिंगमध्ये जेमिसनने विराटला LBW केले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्ये कॅच आऊट केले. जेमिसनची भेदक बॉलिंग टीम इंडियाला भारी पडली. त्यामुळे न्यूझीलंडची टीम वर्ल्ड चॅम्पियन झाली. काईल जेमिसननं पहिल्या इनिंगमध्ये पाच तर दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट्स घेतल्या. या सर्वोत्तम प्रदर्शनासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आले. विराट कोहलीनं देखील मॅच संपल्यावर त्याची प्रशंसा केली होती. तसंच संपूर्ण न्यूझीलंड टीमचं विराटनं अभिनंदन केलं. WTC Final नंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, प्रमुख खेळाडू जखमी न्यूझीलंडमधील वेबसाईट TheAccNZ मात्र हा आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध करत विराटचा अपमान केला आहे. या वेबसाईटवरुन क्रिकेट आणि इतर खेळाची कॉमेंट्री केली जाते. याचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरीफायड आहे. त्याचबरोबर त्याचे 45 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Instagram, New zealand, Virat kohli

    पुढील बातम्या