जयपूर, 25 फेब्रुवारी : पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ची आक्रमक डबल सेंच्युरी आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची सेंच्युरी याच्या जोरावर मुंबईनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) चार आऊट 457 रन केले. हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. त्याचबरोबर 50 ओव्हर्सच्या क्रिकेटमधील चौथ्या क्रमांकाचा मोठा स्कोअर आहे. पृथ्वी शॉ ने नाबाद 227 रन काढले. हा विजय हजारे ट्रॉफीमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर देखील आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड संजू सॅमसन (Sanju Samson) च्या नावावर होता. त्यानं नाबाद 212 रन काढले होते.
सूर्यकुमारची आक्रमक खेळी
सूर्यकुमार यादवची इंग्लंड विरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या मालिकेसाठी निवड झाली आहे. त्यानं पुदुच्चेरी (Puducherry) विरुद्ध या निवडीचं सेलिब्रेशन केलं. यादवनं फक्त 50 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली.यादवनं 58 बॉलमध्ये 229 च्या स्ट्राईक रेटनं 133 रन काढले. ज्यामध्ये 22 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याचाच अर्थ त्यानं फक्त 26 बॉलमध्ये 120 रन काढले. लिस्ट A मॅचमधील ही दुसऱ्या क्रमांकाची वेगवान सेंच्युरी आहे. यापूर्वी युसूफ पठाणनं 2010 साली महाराष्ट्राविरुद्ध फक्त 40 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.
You are currently looking at the man who has scored a stunning 💯 for Mumbai in the #VijayHazareTrophy today 💙
🏏 133 (58)
👌 26 boundaries
🔥 230 SR#OneFamily #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6ORx7v8Swl
— Mumbai Indians (@mipaltan) February 25, 2021
मुंबईचा सर्वोच्च स्कोअर
जयपूरमध्ये सुरु असलेल्या या मॅचमध्ये मुंबईनं पुदुच्चेरी विरुद्ध 4 आऊट 457 रन केले. हा या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोअर आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या टीमनं पहिल्यांदाच 450 पेक्षा जास्त रन केले आहेत. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच झारखंडनं मध्य प्रदेशच्या विरुद्ध 9 आऊट 422 रन केले होते.
(वाचा : 'मुंबई'साठी कायपण! शार्दुल ठाकूरचा कार घेऊन 700 किमीचा प्रवास)
पृथ्वी शॉ चा विक्रम
पृथ्वी शॉ ने 152 बॉलमध्ये 31 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं नाबाद 227 रन काढले. हा 50 ओव्हरच्या क्रिकेटमधील 8 व्या क्रमांकाचा सर्वोच्च स्कोअर आहे. भारताचा विचार केला तर हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च स्कोअर आहे. पृथ्वीपेक्षा भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (264) आणि शिखर धवन (248) यांनी जास्त रन बनवले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Mumbai, Prithvi Shaw, Sports, Team india, Vijay hazare trophy