Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाच्या ऑल राऊंडरने झळकावलं शतक, आफ्रिका दौऱ्यासाठी दावेदारी सादर

IND vs SA : टीम इंडियाच्या ऑल राऊंडरने झळकावलं शतक, आफ्रिका दौऱ्यासाठी दावेदारी सादर

टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) जाणार आहे. आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या ऑल राऊंडरने दमदार शतक झळकावत वन-डे टीमसाठी दावेदारी सादर केली आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) जाणार आहे. या दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा बुधवारी झाली आहे. वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वन-डे टीमची अद्याप घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार या टीमच्या निवडीवेळी केला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौरा तोंडावर आलेला असतानाच टीम इंडियाच्या ऑल राऊंडरनं दमदार शतक झळकावत दावेदारी सादर केली आहे. मध्य प्रदेशचा खेळाडू व्यंकटेश अय्यरनं (Venkatesh Iyer)  गेल्या काही महिन्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून दमदार कामगिरी केल्यानंतर त्याची न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सीरिजसाठी निवड करण्यात आली होती. हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून अय्यरकडे सध्या पाहिले जात आहे. अय्यरची नजर सध्या वन-डे सीरिजवर आहे. या सीरिजपूर्वी त्यानं दमदार शतक झळकावले आहे. मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या अय्यरनं केरळविरुद्ध फक्त 84 बॉलमध्ये शतक झळकावले. या खेळात त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले. अय्यरच्या आक्रमक शतकामुळे मध्य प्रदेशनं 9 आऊट 329 पर्यंत मजल मारली. अय्यरला शुभम शर्मानं 82 रन करत चांगली साथ दिली. केरळकडून विष्णू विनोदनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. Travis 'Head' ने उंचावली ऑस्ट्रेलियाची 'मान', इंग्लंडवर मिळाली भक्कम आघाडी व्यंकटेश अय्यरनं या वर्षाच्या सुरुवातीला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आक्रमक शतक झळकाले होते. त्याने पंजाब विरुद्ध ओपनिंगला येत 146 बॉलमध्ये 20 फोर आणि 7 सिक्सच्या जोरावर 198 रन काढले होते. या खेळीमुळेच त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं करारबद्ध केले होते. अय्यरनं आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला केकेआरनं रिटेन केले आहे. यापूर्वी ओपनर म्हणून खेळणाऱ्या अय्यरनं टीम इंडियाची गरज म्हणून या स्पर्धेत मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याची सुरूवात केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, South africa, Team india

    पुढील बातम्या