जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes Series : Travis 'Head' ने उंचावली ऑस्ट्रेलियाची 'मान', इंग्लंडवर मिळाली भक्कम आघाडी

Ashes Series : Travis 'Head' ने उंचावली ऑस्ट्रेलियाची 'मान', इंग्लंडवर मिळाली भक्कम आघाडी

Ashes Series : Travis 'Head' ने उंचावली ऑस्ट्रेलियाची 'मान', इंग्लंडवर मिळाली भक्कम आघाडी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टचा गुरुवारी दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये भक्कम आघाडी मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिस्बेन, 9 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टचा गुरुवारी दुसरा दिवस होता. या दिवशी चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली होती. त्यावेळी त्यांचा मिडल ऑर्डरचा बॅटर ट्रेव्हिस हेड (Travis Head) ने आक्रमक शतक झळकावत यजमानांना भक्कम आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंडची पहिली इनिंग  इंग्लंडची पहिली इनिंग 147 रनमध्ये संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं एक विकेटच्या मोबदल्यातच इंग्लंडचा स्कोअर पार केला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लबूशेन (Marnus Labuschange) यांनी अर्धशतक झळकावली. लबूशेन 74 रनवर आऊट झाल्यानंतर ही जोडी फुटली. लबूशेन आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली होती.  1 आऊट 166 वरुन 5 आऊट 194 अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली होती. डेव्हिड वॉर्नरचं  25 वं शतक फक्त 6 रनने हुकलं.

जाहिरात

ऑस्ट्रेलियाची निम्मी टीम परतल्यानंतर इंग्लंडनं मॅचमध्ये पुनरागमन केले असंच वाटत होते. त्यावेळी पाचव्या क्रमांकावर आलेल्या हेडने प्रतिहल्ला केला. त्याने दबावात न खेळता मुक्तपणे फटकेबाजी केली. 51 बॉलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या हेडने नंतर आणखी आक्रमक बॅटींग केली. त्याने त्याचे टेस्ट कारकिर्दीमधील तिसरे शतक फक्त 85 बॉलमध्ये पूर्ण केले. या खेळीत हेडने 12 फोर आणि 2 सिक्स लगावले.

हेडच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 7 आऊट 343 पर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हेड 112 आणि मिचेल स्टार्क 10 रन काढून खेळत होते. ऑस्ट्रे्लियाकडे आता 196 रनची भक्कम आघाडी असून त्यांच्या 3 विकेट्स आणखी शिल्लक आहेत. Ashes Series : डेव्हिड वॉर्नरनं पुन्हा No Ball वर आऊट, पण यंदा ‘ती’ पंरपरा खंडीत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात