जयपूर, 26 डिसेंबर : आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) होत असलेल्या प्रत्येक स्पर्धेकडं सर्व टीमच्या मॅनेजमेंटचं लक्ष आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक नवे-जुने स्टार खेळत असल्यानं या स्पर्धेला मोठं महत्त्व आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूनं शतक झळकावलं आहे. त्यानं हे शतक झळकावत आपण अद्याप फॉर्मात असल्याचं सर्व टीमना सांगितलं आहे.
तामिळनाडू विरुद्ध हिमाचल प्रदेश (Tamil Nadu vs Himachal Pradesh) यांच्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची फायनल सुरू आहे. या फायनलमध्ये तामिळनाडूकडून खेळताना अनुभवी दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) शतक झळकावले. तामिळनाडूची टीम संकटात असताना कार्तिकनं त्याचा अनुभव पणाला लावून शतक झळकावलं.
💯 for @DineshKarthik! 👏 👏
What a knock this has been from the Tamil Nadu veteran! 🙌 🙌 #HPvTN #VijayHazareTrophy #Final Follow the match ▶️ https://t.co/QdnEKxJB58 pic.twitter.com/8YCXG5aQIy — BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2021
कार्तिकनं 4 आऊट 40 या नाजूक परिस्थितीमधून तामिळनाडूचा डाव सावरला. त्याने 103 बॉलमध्ये 8 फोर आणि 7 सिक्ससह 116 रन काढले. कार्तिकनं पाचव्या विकेटसाठी बाबा इंद्रजीत बरोबर 202 रनची भागीदारी केली. इंद्रजीत 80 रन काढून आऊट झाला. त्यापूर्वी तामिळनाडूची सुरुवात खराब झाली होती. तामिळनाडूचे ओपनर्स झटपट आऊट झाले. त्यानंतर साई किशोर आणि एम. अश्विन या बॉलर्सना प्रमोशन देण्याची त्यांची चाल फसली. किशोर 18 तर अश्विन 7 रन काढून आऊट झाला. त्यानंतर कार्तिक आणि इंद्रजीत जोडीनं तामिळनाडूला सावरले.
'क्रिकेट ऑस्टेलिया'त खळबळ, महिलेसोबत अश्लील डान्स केल्याचा खेळाडूवर आरोप
शाहरुखचा जलवा
या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या शाहरूख खाननं (Shahrukh Khan) फायनलमध्येही धडाका कायम ठेवला. त्याने फक्त 21 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 42 रन काढले. शाहरूखनं 200 च्या स्ट्राईक रेटनं केलेल्या फटकेबाजीमुळेच तामिळनाडूला 49.4 ओव्हर्समध्ये 314 पर्यंत मजल मारता आली. हिमाचल प्रदेशकडून पंकज जयस्वाल सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्याने 4 विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022 auction, Tamil nadu, Vijay hazare trophy