मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) याांच्यात सध्या अॅशेस सीरिज सुरू आहे. या सीरिजच्या दरम्यान लीक झालेल्या एका रिपोर्टनं क्रिकेट ऑस्ट्रेलियात (Cricket Australia) खळबळ उडाली आहे. या रिपोर्टमध्ये एका महिलेची क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी इंटिग्रिटी प्रमुख सीन कॅरोल यांच्यासोबत केलेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आहे. या व्हिडीओमध्ये महिलेनं आरोप केला आहे की, ‘एका खेळाडूंनं कोकेन या अंमली पदार्थाचे सेवन केले आणि बाल्कनीमध्ये तिच्यासोबत अश्लील डान्स केला. आपण उच्च श्रेणीची ‘एस्कॉर्ट’ असल्याचा या महिलेचा दावा आहे. ’ क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (Cricket Australia) सीईओ निक हॉकले (Nick Hockley) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसंच हा गोपनीय रिपोर्ट मीडियात लीक कसा झाला हे शोधण्यासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. हॉकले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘मी आज सकाळी तो रिपोर्ट पाहिला. तो निराधार रिपोर्ट आहे. गोपनीय माहिती कोणत्याही पद्धतीनं चोरणे हा गुन्हा आहे. आम्ही पोलिसांना याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणात व्हिक्टोरियन पोलिसांची देखील मदत मागितली आहे, असे हॉकले यांनी स्पष्ट केले. हे रेकॉर्डिंग लीग करणाऱ्या व्यक्तीनं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चा माजी कर्मचारी असल्याचा दावा केला आहे. त्याने मेलबर्नमधील एका वृत्तपत्राला ही माहिती अज्ञात पत्त्यावरून कोडवर्डमध्ये पाठवली आहे. इंटिग्रिटी युनिटमधील त्रूटी जगासमोर उघड करणे हा आपला हेतू असल्याचा दावा त्याने केला आहे. Ashes Series : इंग्लंडनं केला 0,0,0,0,0…चा नकोसा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन टीम सध्या अॅशेस सीरिजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. मेलबर्न टेस्ट देखील त्यांनी जिंकली तर या सीरिजवर त्यांचा ताबा कायम असेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.