मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ऑस्ट्रेलियन टीममध्ये फूट, 'या' बॅट्समनचा कोचला पाठिंबा, सहकाऱ्यांना म्हणाला...

ऑस्ट्रेलियन टीममध्ये फूट, 'या' बॅट्समनचा कोचला पाठिंबा, सहकाऱ्यांना म्हणाला...

टी 20 वर्ल्डपूर्वी ऑस्ट्रेलिया टीम अडचणीत आली आहे. त्यांचा बांगलादेशनं टी20 मालिकेत पराभव केला. या नामुश्कीमधून सावरण्यापूर्वीच हेड कोच जस्टीन लँगर (Justin Langer) आणि खेळाडूंमध्ये वाद उघड झाला आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट: टी 20 वर्ल्डपूर्वी ऑस्ट्रेलिया टीम अडचणीत आली आहे. त्यांचा बांगलादेशनं टी20 मालिकेत पराभव केला. या नामुश्कीमधून सावरण्यापूर्वीच हेड कोच जस्टीन लँगर (Justin Langer)  आणि खेळाडूंमध्ये वाद उघड झाला आहे. ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुममधील गोष्टी मागील आठवड्यात लीक झाल्या आहेत. त्यानंतर कोच लँगरच्या पदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावेळी लँगरला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू पुढं आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टीममधून सध्या बाहेर असलेल्या उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यानं कोच लँगरला पाठिंबा दिला आहे. 'खेळाडूंनी आपल्या पाठित सुरा खुपसला असं लँगरला वाटत असेल. हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे खेळाडूंनी यावर तातडीनं उत्तर शोधलं पाहिजे. कोचची चूक शंभर टक्के असून शकत नाहीत. खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल.' असं वक्तव्य ख्वाजानं त्याच्या यु ट्यूब चॅनलवर केलं आहे.

जस्टीन लँगरला कमी लेखू नये तसंच त्याला किमान अ‍ॅशेस सीरिजपर्यंत पदावर ठेवावं असंही ख्वाजा यावेळी म्हणाला. 'खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी लागेल. ही केवळ एकाच व्यक्तीची जबाबदारी नाही. याचा सर्वानी विचार करावा.' 2018 साली डॅरेन लेहमनला बॉल टेम्परिंग प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर लँगरची चार वर्षांसाठी कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता ऑस्ट्रेलिया टीममधील खेळाडू त्याच्यावर नाराज आहेत.

IND vs ENG 3rd Test: शार्दुल की इशांत, पुजारा खेळणार का सूर्या? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

'सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड' या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 'लँगरला त्याच्या शैलीबाबत खेळाडूंची प्रतिक्रिया कळवण्यात आली आहे. एकूण 40 खेळाडू आणि सहयोगी स्टाफकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यावर्षी भारताविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा 1-2 नं पराभव झाला होता. त्यानंतर काही खेळाडूंनी लँगरच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket news