जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG 3rd Test: शार्दुल की इशांत, पुजारा खेळणार का सूर्या? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

IND vs ENG 3rd Test: शार्दुल की इशांत, पुजारा खेळणार का सूर्या? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

IND vs ENG 3rd Test: शार्दुल की इशांत, पुजारा खेळणार का सूर्या? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरी टेस्ट (India vs England Third Test) बुधवारी हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XI मध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत विराट कोहलीला (Virat Kohli) चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हेंडिग्ले, 24 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट (India vs England Third Test)  हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XI मध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत विराट कोहलीला (Virat Kohli) चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलंय. तसंच आठ दिवसांच्या विश्रांतीमुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये 152 ओव्हर्स बॉलिंग केलेले सर्व फास्ट बॉलर्स देखील फ्रेश झाले आहेत. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. आम्हाला आता पुरेसा ब्रेक मिळाला आहे.  भारतीय बॉलर्समध्ये निवडीसाठी स्पर्धा आहे. सर्व फास्ट बॉलर्स खेळण्यासाठी सज्ज असून हा चांगला संकेत आहे.’ मात्र टीम इंडियामध्ये कोणते चार फास्ट बॉलर्स खेळणार याचं उत्तर अजिंक्यनं यावेळी दिलं नाही. शार्दुलच्या अनुपस्थितीमध्ये इशांत शर्माचा लॉर्ड्स टेस्टमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानं 16.40 च्या सरासरीनं 5 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनीही लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भेदक मारा केला होता. त्यांच्या भेदक बॉलिंगमुळे इंग्लंडची टीम पाचव्या दिवशी दोन पूर्ण सेशन खेळू शकली नाही. त्यांच्या या कामगिरीमुळे शार्दुल ठाकूरला या सीरिजमध्ये पुन्हा खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. हेंडिग्लेमधील हवामान देखील शार्दुलच्या निवडीसाठी प्रतिकूल आहे.  या टेस्टच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता 10 टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे हवामान बहुतेक काळ कोरडे राहणार आहे. हे पिच फ्लॅट असेल तर त्यावर तीन फास्ट आणि दोन स्पिन बॉलर खेळवणे अधिक योग्य ठरेल असा सल्ला मायकल होल्डिंगनं दिला आहे. अर्थात आम्ही टीमच्या निवडीबाबत फार काळजीमध्ये नाही, असं अजिंक्यनं स्पष्ट केलं आहे. IND vs ENG: दुखापतग्रस्त इंग्लंडकडून ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण, पाहा कशी असेल Playing XI पूजारा की सूर्यकुमार टीम इंडियाला लीड्स टेस्टमध्ये आणखी एका जागेचा विचार करावा लागणार आहे. नंबर 3 च्या जागेसाठी चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा पर्याय उपलब्ध आहे. मात्र मुंबईच्या सूर्यकुमारनं मागील 18 महिन्यांपेक्षा जास्त रेड बॉल क्रिकेट खेळललं नाही. तर लॉर्ड्स टेस्टमध्ये पुजारानं बऱ्याच कालावधीनंतर समाधानकारक खेळ केला आहे.  अजिंक्य रहाणेनंही पुजाराच्या खेळाची पाठराखण केली होती. त्यामुळे सूर्यकुमार यादवचं टेस्टमधील पदार्पण लांबण्याची शक्यता आहे. टीम इंडियाची संभाव्य Playing XI: केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर/इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात