Home /News /sport /

ख्रिस गेलनं दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाला....

ख्रिस गेलनं दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाला....

देशात आज सर्वत्र (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा केला जात आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल (Chris Gayle) याने देखील आजच्या दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    मुंबई, 26 जानेवारी : देशात आज सर्वत्र (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा केला जात आहे. या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी देशाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विदेशातील व्यक्ती देखील याला अपवाद नाहीत. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल (Chris Gayle) याने देखील आजच्या दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असलेला गेल भारतामध्ये भरपूर क्रिकेट खेळला आहे. तो आयपीएल टीमचाही सदस्य होता. त्याचे भारतामध्ये भरपूर फॅन्स आहेत. गेलनं प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एक ट्विट केलं आहे. 'मी भारतीयांना 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वैयक्तिक संदेशामुळे जाग आली. यामध्ये त्यांनी भारतीयांशी असलेले माझे घनिष्ठ संबंध आणि जिव्हाळा याचा उल्लेख केला होता. युनिव्हर्स बॉसकडून तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि प्रेम.' या शब्दात गेलनं शुभेच्छा दिल्या आहेत. युनिव्हर्स बॉस आणि आयपीएल स्पर्धेचा मोठा सुपरस्टार ख्रिस गेलनं (Chris Gayle) आगामी लिलावासाठी नाव नोंदवलेलं नाही. गेल सध्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून निरोपाची मॅच खेळण्याची संधी मिळावी अशी त्याला अपेक्षा आहे. त्यामुळे त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा Ball Tampering, अंपायरनं केली टीमला शिक्षा ख्रिस गेल हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या टीमकडून खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये गेल सातव्या क्रमांकावर आहे. त्याने 142 मॅचमध्ये 39.72 च्या सरासरीनं 4965 रन केले आहेत. त्याने 148.96 च्या स्ट्राईक रेटनं हे रन केले असून यामध्ये 6 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेलनं आयपीएलमध्ये 404 फोर आणि 357 सिक्सची बरसात केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chris gayle, PM narendra modi, Republic Day

    पुढील बातम्या