Home /News /sport /

मोठी बातमी ! क्रिकेटमध्ये पुन्हा Ball Tampering, अंपायरनं केली टीमला शिक्षा

मोठी बातमी ! क्रिकेटमध्ये पुन्हा Ball Tampering, अंपायरनं केली टीमला शिक्षा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये 4 वर्षांपूर्वी बॉल टेम्परिंगचा (Ball Tampering) प्रकार घडला होता. त्या प्रकरणाचे मोठे पडसाद क्रिकेट विश्वात उमटले. आता त्यानंतर पून्हा एकदा या प्रकारचे प्रकरण समोर आले आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये 4 वर्षांपूर्वी बॉल टेम्परिंगचा (Ball Tampering) प्रकार घडला होता. त्या प्रकरणाचे मोठे पडसाद क्रिकेट विश्वात उमटले. आता त्यानंतर पून्हा एकदा या प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलँड्स  (Afghanistan vs Netherlands) यांच्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अफगाणिस्ताननं ही मॅच 75 रननं सहज जिंकली. त्याचबरोबर या मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. या विजयापेक्षाही तिसऱ्या मॅचमध्ये झालेल्या बॉल टेम्परिंगची जास्त चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरू आहे. अफगाणिस्तानची बॅटींग सुरू असताना 31 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी नेदरलँडकडून ब्रेंडन ग्लोवर बॉलिंग करत होत. अंपायरनं या प्रकरणात नेदरलँडच्या टीमला 5 रनचा दंड ठोठावला आणि ते रन अफगाणिस्तानच्या खात्यामध्ये जोडले.  मात्र या प्रकरणात कोणत्याही खेळाडूवर कारवाई करण्यात आलेली नाही. या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटींग करत 5 आऊट 254 रन केले. वनड-डे क्रिकेटमध्ये पदार्पण  करणाऱ्या रियाज हसननं 75 बॉलमध्ये 50 रन केले. तर नजीबुल्लाह झरदाननं 59 बॉलमध्ये 71 रनची खेळी केली. झारदाननं यावेळी 8 फोर आणि 3 सिक्स लगावले. Yuvraj Singh Love Story: युवराजला हेजलची पहिली भेट घेण्यासाठी 3 वर्ष करावी लागली प्रतीक्षा नेदरलँड्सची टीम या टार्गेटचा पाठलाग करताना 42.4 ओव्हर्समध्ये 179 रनवर आऊट झाला. ओपनर बॅटर स्कॉट एडवर्ज्सनं 54 तर कॉलीन एकरमननं 81 रन केले. नेदरलँड्सचा स्कोअर एकवेळेस बिनबाद 103 होता. पण, ओपनिंग जोडी परतल्यानंतर त्यांची इनिंग कोसळली.  नेदरलँड्सच्या 8 खेळाडूंना दोन अंकी रन करता आले नाहीत. अफगाणिस्तानकडून कैश अहमदनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तर लेग स्पिनर राशिद खाननं (Rashid Khan) 2 विकेट घेतल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket news

    पुढील बातम्या