Home /News /sport /

U19 वर्ल्ड कपचा आजपासून थरार, भारतासह 4 टीम विजेतेपदाच्या दावेदार

U19 वर्ल्ड कपचा आजपासून थरार, भारतासह 4 टीम विजेतेपदाच्या दावेदार

वेस्ट इंडिजमध्ये आजपासून (शुक्रवार) अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेला (Under 19 World Cup 2022) सुरूवात होत आहे. टीम इंडियासह (Team India) चार टीम विजेतेपदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.

    मुंबई, 14 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये आजपासून (शुक्रवार) अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेला (Under 19 World Cup 2022) सुरूवात होत आहे. यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) लढतीने या स्पर्धेला सुरूवात होईल.  4 वेळा ही स्पर्धा जिंकणारी टीम इंडिया यंदा देखील विजेतेपदाची दावेदार आहे. भारतीय टीमचा ग्रुप B मध्ये समावेश आहे. तर 2 वर्षांपूर्वी फायनलमध्ये भारतीय टीमचा पराभव करणाऱ्या बांगलादेशचा ग्रुप A मध्ये समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होणार आहेत. प्रत्येत ग्रुपमध्ये 4 टीमचा समावेश आहे. सर्व ग्रुपमधील टॉप 2 टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील. अफगाणिस्तानच्या टीमचा व्हिसाच्या कारणामुळे सहभाग धोक्यात आला होता, पण ही टीम देखील अखेर  दाखल झाली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. या वर्ल्ड कपवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या कारणामुळेच न्यूझीलंडनं स्पर्धेत टीम पाठवलेली नाही. यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतासह चार टीम विजेतेपदाच्या दावेदार मानल्या जात आहेत. आयर्लंडनं केली खळबळजनक निकालाची नोंद, वेस्ट इंडिजचा दिला पराभवाचा धक्का भारत : यश ढूलच्या (Yash Dhull) कॅप्टनसीमध्ये खेळणारी टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. भारतीय टीम आशिया कप स्पर्धा जिंकून वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे. त्याचबरोबर स्पर्धेपूर्वीच्या दोन्ही वॉर्मअप सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. भारतीय टीममध्ये कॅप्टन ढूलसह हरनूर सिंग, एसके रशिद आणि यशवर्धन हंगरगेकर हे भविष्यातील स्टार खेळाडू आहेत. त्यांच्या जोरावर टीम इंडिया पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकू शकते. ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया टीमनं 3 वेळा ही स्पर्धा जिंकलेली असली तरी शेवटचं विजेतपद 2010 साली पटकावले आहे. यंदा 12 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची टीमला संधी आहे. ऑल राऊंडर कूपर कनोली टीमचा कॅप्टन आहे. त्याने 2020 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या 'प्ले ऑफ' लढतीत 53 बॉलमध्ये 64 रन काढले होते. Under 19 World Cup : टीम इंडियाची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेशी, वाचा संपूर्ण वेळापत्रक पाकिस्तान : 5 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तानने 2004 आणि 2006 साली ही स्पर्धा जिंकली होती. यंदाही या टीमला विजेतेपदाची संधी आहे. कासिम अक्रम या टीमचा कॅप्टन असून माजी क्रिकेटपटू एजाज अहमद कोच आहे. इंग्लंड :  इंग्लंडने 24 वर्षांपूर्वी फक्त एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. या टीममध्ये अनेक उपयुक्त खेळाडू असून त्यामुळे इंग्लंडलाही विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या