मुंबई, 13 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC U19 World Cup) शुक्रवारी सुरुवात होत आहे. या स्पर्धेची पहिली मॅच 14 जानेवारी रोजी तर फायनल 5 फेब्रुवारीला होणार आहे. यंदा 16 टीम स्पर्धेत भाग घेत आहेत. त्यांच्यामध्ये एकूण 48 लढती होतील. चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय टीमचा (Team India) ग्रुप B मध्ये समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाची पहिली लढत 15 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गयानामध्ये होणार आहे. यश ढूल (Yash Dhull) या टीमचा कॅप्टन आहे. भारतीय टीम आशिया कप जिंकून या स्पर्धेत दाखल झाली आहे. त्यानंतर त्यांनी दोन वॉर्म अप मॅच देखील जिंकल्या आहेत. पण, तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत चुरशीची होईल असा अंदाज आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
त्यानंतर टीम इंडियाची दुसरी लढत त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडिअमवर 19 जानेवारी रोजी होणार आहे. तर याच मैदानावर भारताचा ग्रुप स्टेजमधील तिसरा आणि शेवटा सामना 22 जानेवारी रोजी युगांडा विरुद्ध होईल.
या वर्ल्ड कपमधील 16 टीमची 4 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप A मध्ये बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि यूएई या टीमचा समावेश आहे. ग्रुप C मध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे या टीम आहेत. तर ग्रुप D मध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड टीमचा समावेश आहे. युंगाडाची टीम पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्ड कप खेळत आहे. या टीमचा भारतासोबत ग्रुप B मध्ये समावेश आहे.
IPL मधील 2 टीम जगात भारी! बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडच्या रांगेत केला प्रवेश
टीम इंडियाचे वेळापत्रक
15 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका, गयाना
19 जानेवारी : भारत विरुद्ध आयर्लंड, त्रिनिदाद
22 जनवरी : भारत विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद
अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
यश ढूल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बावा, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासू वत्सो, विक्की ओस्तवाल, रवी कूमार आणि गर्व सांगवान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.