मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार, वाचा का घेतला मोठा निर्णय?

न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार, वाचा का घेतला मोठा निर्णय?

आयसीसीनं बुधवारी पुढील वर्षा होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेतून न्यूझीलंडनं (New Zealand) माघार घेतली आहे.

आयसीसीनं बुधवारी पुढील वर्षा होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेतून न्यूझीलंडनं (New Zealand) माघार घेतली आहे.

आयसीसीनं बुधवारी पुढील वर्षा होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेतून न्यूझीलंडनं (New Zealand) माघार घेतली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर : टी20 वर्ल्ड कपची सांगता होताच (T20 World Cup 2021) आयसीसीनं आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांची तयारी करण्यास सुरूवात केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून 2024 ते 2031 या काळातील  8 स्पर्धांचे यजमान देश जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी 3 स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष ठेवून 2024 साली होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup 2024) संयुक्त यजमानपद अमेरिकेला देण्यात आलं आहे.

आयसीसीनं बुधवारी पुढील वर्षी वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं (Under-19 Cricket World Cup 2022) वेळापत्रक जाहीर केलं आहे. हे वेळापत्रक जाहीर होताच स्पर्धेला धक्का बसला आहे. न्यूझीलंडनं या स्पर्धेतून माघार (New Zealand withdraw from 2022 Under 19 World Cup) घेतली आहे. न्यूझीलंडनं हा निर्णय देशातील अल्पवयीन नागरिकांना स्पर्धेतून परत आल्यानंतर पाळव्या लागणाऱ्या अनिवार्य क्वारंटाईन नियमांमुळे घेतला आहे.

न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा (Scotland) 16 वी टीम म्हणून स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडला यापूर्वी या वर्ल्ड कपसाठी पात्र होण्यात अपयश आलं होतं. 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमधील 10 वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाईल. यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) स्पर्धेनं या वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.

अंडर-19 वर्ल्ड कप 1988 पासून खेळवला जात आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या 13 सिझन झाले आहेत. त्यामध्ये भारताने सर्वाधिक 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला 3, पाकिस्तानला 2 तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला प्रत्येकी 1-1 वेळा विजय मिळाला आहे. 2020 साली झालेल्या अखेरच्या अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.विराट कोहलीनंही कर्णधार म्हणून एकदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे.

IND vs NZ : विराट-शास्त्रीच्या जमान्यात संपलंच होतं करियर, रोहितने या खेळाडूला दिली 'संजिवनी'

अंडर-19 वर्ल्ड कपमधून अनेक स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले आहेत. यामध्ये विराट कोहली, बाबर आझम, जो रूट, केन विलियमसन, शिमरन हेटमायर यांचा समावेश आहे. भारताने 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात, 2008 साली विराट कोहली, 2012 साली उन्मुक्त चंद आणि 2018 साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता.

First published:

Tags: Cricket news, New zealand