मुंबई, 5 फेब्रुवारी: भारत विरूद्ध इंग्लड यांच्यात आज अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल
(Under 19 World Cup Final) होणार आहे. टीम इंडियानं यापूर्वी 4 वेळा हा वर्ल्ड कप जिंकला आहे. आता पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय टीम प्रयत्न करेल. फायनलमधील इंग्लंडचा अडथळा दूर करण्यासाठी टीम इंडियाकडे 11 खेळाडूंची तगडी टीम आहे. लोणावळ्याचा विकी ओस्तवाल
(Vicky Ostwal) हा या टीममधील महत्त्वाचा सदस्य आहे.
विकीनं या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. फायनलपर्यंतच्या सर्व मॅच खेळलेल्या मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी तो आहे. त्याने प्रत्येत मॅचमध्ये अचूक बॉलिंग करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांच्या अकदामीचा विकी विद्यार्थी आहे. पुण्यातील वेंगसरकर अकदामीमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणासाठी तो रोज 3 तास लोकलनं प्रवास करत असे. त्याच्या या कष्टामुळेच तो अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील स्टार म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
गेल्या 10 वर्षांपासून विकीचा प्रवास जवळून पाहणारे त्याचे कोच मोहन जाधव यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, 'विकीला रन द्यायला अजिबात आवडत नाही. तो स्पिनर असला तरी त्याची विचार करण्याची पद्धत फास्ट बॉलरसारखी आहे. त्याला 6 फूट उंचीचा फायदा मिळतो. त्यामुळे त्याचे बॉल चांगले बाऊन्स होतात. त्यामुळे बॅटरना खेळताना त्रास होतो. यापूर्वी तो रन जाऊ नयेत म्हणून बॉल फ्लाईट करत नसे. पण, मागच्या 2 वर्षांमध्ये त्याच्या बॉलिंगमध्ये चांगलेच वैविध्य आले आहे.'
अनिल कुंबळेच्या हकालपट्टीची सेहवागला कल्पना होती! वाचा धक्कादायक Inside Story
CSK मुळे फायदा
विकी 2019 साली चेन्नई सुपर किंग्सचा
(CSK) नेट बॉलर होता. 'त्याने नेटमध्ये बॉलिंग करताना शेन वॉटसनला आऊट केले होते. त्याचबरोबर सीएसकेचा स्पिनर इम्रान ताहीरकडून तो स्पिन बॉलिंगमधील बारकावे शिकला. सीएसके कॅम्पमधून परतल्यानंतर विकी वेगळाच बॉलर झाला होता. त्यानंतर त्याचा बॉल आणखी टर्न होऊ लागला. हे अंडर 19 वर्ल्ड कपमध्येही दिसत आहे. तो बॅटर्सना धोकादायक शॉट खेळण्यासाठी भाग पाडतो आणि विकेट घेतो,' असे जाधव यांनी स्पष्ट केले.
विकीनं अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 5 मॅचमध्ये 1075 च्या सरासरीनं 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 3.39 आहे. विकीने या स्पर्धेत दर 3 ओव्हरनंतर एक विकेट घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये त्यानं 5 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड विरूद्धच्या फायनलमध्येही त्याच्याकडून त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.