नमो रमो ट्रॉफी : क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात पण मराठी भाषिकांनाच नो एन्ट्री, संतापजनक प्रकार

नमो रमो ट्रॉफी : क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात पण मराठी भाषिकांनाच नो एन्ट्री, संतापजनक प्रकार

महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत चक्क मराठी भाषिकांनाच प्रवेश नाकाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च : राज्यात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी तयारी सुरु आहे. तरीही मराठीची सुरु असलेली गळचेपी मात्र थांबत नसल्याचं दिसतं. मुंबईत अनेकदा मराठीऐवजी हिंदीसह इतर भाषांवरून वाद निर्माण झाले आहेत. आताही डोंबिवलीत चक्क मराठी भाषिकांनाच डावलण्यात आल्याचं समोर आलं आहे. डोंबिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेत मराठी भाषिकांनी प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नमो रमो ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये फक्त गुजराती, कच्छी आणि मारवाडी समाजाला सहभागी होता येईल असं सांगण्यात आलं आहे. या स्पर्धेचं पोस्टर व्हायरल झाल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाला विरोध दर्शवण्यात येत आहे.

डोंबिवलीमध्ये खरंतर मराठी नववर्ष मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. याशिवाय मराठी सणांमध्ये मोठा उत्साह इथं असतो. याच डोंबिवलीत क्रिकेट स्पर्धेत मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यानं आश्चर्यासह संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीतील युवा आशापुरा मित्र मंडळाने पहिल्यांदाच नमो रमो ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा भरवली आहे. याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरवर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांचा फोटो आणि भाजपचे चिन्हही आहे.

पोस्टर व्हायरल झाल्यानंतर याबाबत स्पर्धेच्या आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना विचारले असता त्यांनी यात पक्षाचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. ही स्पर्धा त्या समाजापुरती असल्याचं ते म्हणाले.

हे वाचा : लाजीरवाण्या पराभवानंतर विराट भडकला! प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला उलट प्रश्न

शिवसेनेनं मात्र या मुद्द्यावरून भाजपला खोचक टोला लगावला आहे. डोंबिवलीकर सहनशील आहेत, त्यामुळे ते यावर काही प्रतिक्रिया देणार नाहीत, मात्र भाजपनं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

हे वाचा : 'शास्त्री बोलघेवडे, दोन खेळाडूंना संघातून बाहेर काढा', हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य

First published: March 3, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या