मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Live मॅचमध्ये राशिद खानचं दिसलं अफगाणिस्तानबद्दल प्रेम, Photo पाहून कराल सलाम

Live मॅचमध्ये राशिद खानचं दिसलं अफगाणिस्तानबद्दल प्रेम, Photo पाहून कराल सलाम

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) सध्या इंग्लंडमध्ये असला तरी त्याला सतत देशाची चिंता आहे. शुक्रवारी 'द हंड्रेड' (The Hundred league( या स्पर्धेतील एलिमेनेटर लढतीमध्ये तो खेळण्यासाठी उतरला, त्यावेळी त्यानं मैदानातून देशाला पाठिंबा दिला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑगस्ट : अफगाणिस्तानची (Afghanistan) परिस्थिती सध्या बिकट आहे. तालिबाननं देशावर कब्जा केला आहे. तेथील नागरिक जीवाच्या भीतीनं घर आणि देश सोडून पळून जात आहेत. 'आम्हाला या संकटात एकटं सोडू नका,' असं आवाहन अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खाननं (Rashid Khan) काही दिवसांपूर्वी जगभरातील नेत्यांना केले होते. त्याचे कुटुंबीय देखील सध्या अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. तर तो सध्या 'द हंड्रेड' स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे. राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये असला तरी त्याला सतत देशाची चिंता आहे. शुक्रवारी या स्पर्धेतील एलिमेनेटर लढतीमध्ये तो खेळण्यासाठी उतरला, त्यावेळी त्यानं मैदानातून देशाला पाठिंबा दिला.मॅचच्या दरम्यान त्याचा चेहरा पाहून प्रत्येक जण त्याला सलाम करत होता. ट्रेंट रॉकेट्स विरुद्ध साऊथर्न ब्रेव्ह या लढतीसाठी राशिद मैदानात उतरला होता. त्यावेळी त्यानं त्याच्या चेहऱ्यावर अफगाणिस्तानचा झेंड्याचं चित्र काढलं होते. या लढतीत राशिदच्या टीमचा 7 विकेट्सनं पराभव झाला. राशिद खाननं या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थिती पाहाता राशिद खान (Rashid Khan) आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) स्पटेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021) खेळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दोघेही खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याचं स्पष्टीकरण सनरायझर्स हैदराबाद टीमनं दिलं आहे. IND vs ENG: तिसऱ्या टेस्टमध्ये नव्या रणनीतीसह उतरणार इंग्लंड, टीममध्ये करणार 'हे' बदल राशिदच्या टीमचं 'द हंड्रेड' या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तो आता घरी परतणार की इंग्लंडमध्ये थांबणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तो इंग्लडमध्येच थांबला तर बीसीसीआय त्याची विशेष विमानानं यूएईमध्ये येण्याची व्यवस्था करु शकते. टीम इंडिया 15 स्पटेंबर रोजी यूएईला रवाना होणार आहे. त्यांच्यासोबत राशिद यूएईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket news

    पुढील बातम्या