मुंबई, 21 ऑगस्ट: लॉर्ड्स टेस्टमध्ये (Lords Test) झालेल्या पराभवानंतर इंग्लंड टीममध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. यजमान टीमनं 3 खेळाडूंची हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर डेव्हिड मलान आणि साकिब महमूद या दोघांचा समावेश केलाय. तिसरी टेस्ट (India vs England, 3rd Test) 25 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाला रोखण्यासाठी इंग्लंडनं नवी रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटींग ऑर्डरमध्ये बदल होणार असल्याचं वृत्त ब्रिटीश मीडियानं दिलं आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये ओपनिंग जोडी ही इंग्लंडची सर्वात कमकुवत बाजू आढळली आहे. डोम सिब्ली आणि रॉरी बर्न्स टीमला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. लॉर्ड्समधील पराभवानंतर सिब्लीची टीममधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता लीड्समध्ये इंग्लंडची टीम नव्या ओपनिंग जोडीसह उतरणार आहे. रॉरी बर्न्स सोबत हसीब हमीद ओपनिंग करणार आहे. हमीद लॉर्ड्स टेस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर खेळला होता. तर जगातील नंबर 1 टी 20 बॅट्समन डेव्हिड मलान तिसऱ्या नंबरवर खेळणार असल्याचं वृत्त ब्रिटीश मीडियानं दिलं आहे. पहिल्यांदा 3 नंबरवर खेळणार डेव्हिड मलान टी20 क्रिकेटमध्ये नेहमी 3 नंबरवर खेळतो. पण, तो टेस्ट क्रिकेटमध्ये कधीही या नंबरवर खेळलेला नाही. त्यानं तीन टेस्टमध्ये 4 नंबरवर तर 12 टेस्टमध्ये 5 व्या नंबरवर बॅटींग केली आहे. मलानचं टेस्ट करिअर तितकं यशस्वी ठरलेलं नाही. त्यानं 15 टेस्टमध्ये 27.84 च्या सरासरीनं 724 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. T20 World Cup सेमी फायनलमध्ये पोहोचतील या 4 टीम, गंभीरची भविष्यवाणी तो टीम इंडियाविरुद्ध 2018 साली एक टेस्ट खेळला होता. त्या टेस्टमध्ये त्यानं 28 रन काढले होते. आता फॉर्मात असलेल्या भारतीय फास्ट बॉलर्ससमोर मोठी खेळी करुन इंग्लंडच्या बॅटींग ऑर्डरला स्थैर्य देण्याचं आव्हान मलानसमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.