जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Corona Effect : 10 क्रिकेटपटू बाशिंग बांधून बसलेत पण व्हायरस जाईना म्हणून थांबलेत

Corona Effect : 10 क्रिकेटपटू बाशिंग बांधून बसलेत पण व्हायरस जाईना म्हणून थांबलेत

Corona Effect : 10 क्रिकेटपटू बाशिंग बांधून बसलेत पण व्हायरस जाईना म्हणून थांबलेत

लग्नाची हळद अंगाला लावायची ते आता कोरोनामुळे हाताला सॅनिटायझर लावायची वेळ आलीय असा व्हायरल जोक वाचलाच असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही हाच अनुभव आलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 04 एप्रिल : कोरोना व्हायरसची भीती लोकांमध्ये आहे. या गंभीर अशा परिस्थितीतही लोकांनी कोरोनावर गाणी, मीम्स तयार केली आहेत. विनोदही व्हायरल होत आहेत. सध्या लग्नाचा हंगाम पण या कोरोनामुळे सगळंच बंद झालं आहे. यामुळं यंदातरी हळद लावायची असं ठरलेल्यांना हाताला सॅनिटायझर लावायची वेळ आली असा विनोदही शेअर केला जात आहे. हे सर्वसामान्यांचे विनोद आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही लागू होत आहेत. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द कऱण्यात आल्या. आता पुढचे सामने कधी सुरु होतील हे माहिती नाही. सगळेच खेळाडू घरात बंद झाले आहेत. यातच काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांनी कोरोनामुळे लग्नही पुढं ढकललं आहे. ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 8 क्रिकेटपटूंना कोरोनामुळे त्यांचं लग्न रद्द करावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियात स्पोर्ट्स शेड्युलनुसार अनेक क्रिकेटपटू एप्रिलमध्ये लग्न करण्यास प्राधान्य देतात. मात्र यंदा कोरोनामुळे ते शक्य नाही. लग्न रद्द करण्याची वेळ आलेल्या खेळाडूंमध्ये फिरकीपटू अॅडम झाम्पा, वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्ड, डी आर्ची शॉर्ट, मिशेल स्वॅपसन, एलिस्टर मॅकडेरमोट, अँड्र्यू टाय, जेन जोनासन, कॅटलिन फ्रायट यांचा समावेश आहेत. ऑस्ट्रेलियातही अनेक शहरांमध्ये लोकांना घरातून बाहेर  न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे वाचा : कोरोना कशाला जिवंत राहतोय? कॅशिअर इस्त्री घेऊनच बसलाय, पाहा VIDEO याशिवाय आणखी दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे लग्नही यामुळं पुढं ढकललं आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांच्याही लग्नावर कोरोनाचा इफेक्ट झाला आहे. मॅक्सवेलनं फेब्रुवारीत गर्लफ्रेंडसोबत एंगेजमेंट केली होती. तर पॅट कमिन्सने एंगेजमेंट कऱणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र कोरोनामुळे आता त्यांचे लग्न पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. स्मृती मानधनाला लाइफ पार्टनरकडून फक्त दोनच अपेक्षा,  चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर दिलं उत्तर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात