मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज होणार की नाही? ICC दिलं मोठं अपडेट

भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज होणार की नाही? ICC दिलं मोठं अपडेट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीरिज (India vs Pakistan Cricket Series) कधी होणार? हा प्रश्न दोन्ही देशांच्या फॅन्सना आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) महत्त्वाचं अपडेट दिलं आहे

    मुंबई, 13 नोव्हेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील क्रिकेट मॅच पाहण्याची  जगभरात मोठी उत्सुकता असते. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) तब्बल दोन वर्षानंतर दोन्ही देशांच्या टीम एकमेकांच्या समोर आल्या होते. ही मॅच तब्बल 167 मिलियन (16.7 कोटी) प्रेक्षकांनी पाहिला. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील एका मॅचच्या प्रेक्षक संख्येचा हा रेकॉर्ड आहे. दोन्ही टीममधील प्रत्येक मॅच सुपर हिट असतानाही 2012-13 नंतर भारत-पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय सीरिज (India vs Pakistan bilateral Series) झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीरिज कधी होणार? हा प्रश्न दोन्ही देशांच्या फॅन्सना आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) महत्त्वाचं अपडेट दिलं आहे. आयसीसीचे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस  (Geoff Allardice) यांनी दुबईत पत्रकारांशी बोलताना भारत-पाकिस्तान सीरिजबाबत मत व्यक्त केलं आहे. 'द्विपक्षीय सीरिजमध्ये आमची भूमिका नसेल. आयसीसी स्पर्धेत त्यांच्या मॅच होते त्याचा आम्हाला आनंद आहे. पण दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डातील संबंधावर आयसीसी काहीही प्रभाव टाकू शकत नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड सहमत झाले तरच द्विपक्षीय सीरिज होऊ शकते. त्यांच्यात सहमती नसेल तर ही सीरिज होत नाही. भारत आणि पाकिस्तान या देशांमधील परिस्थिती पाहता क्रिकेट सीरिज लवकर होणे शक्य नाही.' असं ज्योफ यांनी स्पष्ट केले. T20 World Cup: ICU मधून मैदानात उतरलेल्या रिझवाननं भारतीय व्यक्तीला दिलं खास गिफ्ट भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय सीरिज 2012-13 साली झाली होती. तर टेस्ट सीरिज 2007 साली भारतामध्ये झाली आहे. त्यानंतर 2009 साली टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती. पण, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन सिद्ध झाल्यानंतर भारताने हा दौरा रद्द केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध संपुष्टात आले आहेत. आता या टीम फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरूद्ध खेळतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Icc, India vs Pakistan

    पुढील बातम्या