मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन वन-डे मॅचच्या मालिकेसाठी (India vs England ODI Series) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चार मुंबईकरांचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर या चार जणांचा भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे वन-डे टीममध्ये सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी तरी विजय हजारे स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतरही पृथ्वी शॉ कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विजय हजारे स्पर्धेत पृथ्वी शॉ ने सर्वात जास्त रन करत विक्रम केला होता. पृथ्वी शॉ प्रमाणे कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कलकडंही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Shubman Gill, Shreyas, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), KL Rahul (wk), Y Chahal, Kuldeep Yadav, Krunal Pandya, W Sundar, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Md. Siraj, Prasidh Krishna, Shardul Thakur.
— BCCI (@BCCI) March 19, 2021
तीन नवे चेहरे
वन-डे मालिकेसाठी भारतीय टीममध्ये नव्या खेळाडूंना संधी मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार या टीममध्ये सूर्यकुमार यादवसह कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. कृणाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांची देशांतर्गत स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे टीममध्ये निवड झाली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 मॅचची वन-डे मालिका ही 23 मार्च ते 28 मार्च दरम्यान पुण्यात होणार आहे. भारत- इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका भारताने 3-1 अशी जिंकली होती. तर T20 मालिका सध्या 2-2 ने बरोबरीत आहे.
(हे वाचा- IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवरून मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर)
वन-डे मालिकेसाठी भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेट किपर), केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Rohit sharma, Shardul Thakur, Sports