मुंबई, 2 जुलै: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड
(Rahul Dravid) सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीमचा हेड कोच आहे. द्रविड दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून दिसणार आहे, यापूर्वी 2014 साली इंग्लंड दौऱ्यावर तो बॅटींग सहाय्यक म्हणून टीम इंडियासोबत गेला होता. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री
(Ravi Shastri) यांचा कालावधी येत्या वर्षाच्या अखेरीस संपत आहे. या पदासाठी शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
रवी शास्त्री सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीच्या
(Virat Kohli) टीमचा हेड कोच आहे. ही टीम इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे. तर शिखर धवनच्या
(Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंकेत असलेल्या टीमच्या प्रशिक्षणाची जबाबदारी द्रविडकडं आहे. भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर तीन वन-डे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे.
राहुल द्रविड यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीमध्ये भारत ए आणि अंडर-19 टीमचा कोच होता. तसेच तो सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा
(NCA) संचालक आहे. द्रविड आगामी काळात रवी शास्त्रीची जागा घेऊ शकतो, असा दावा माजी क्रिकेटपटू रितिंदर सिंग सोधीनं
(Reetinder Singh Sodhi) केला आहे.
भारताच्या माजी ऑल राऊंडरनं ‘इंडिया न्यूज’ ला बोलताना हा दावा केला. “राहुल द्रविडची नियुक्ती तात्पुरती नाही. तो टीम इंडियाचा पुढील कोच होण्याच्या तयारीत आहे. यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर शास्त्रींची मुदत संपत आहे. त्यानंतर त्या जागेसाठी द्रविड हा प्रबळ दावेदार आहे.” असे सोधीने सांगितले.
इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल ‘इतक्या’ कालावधीसाठी आऊट
सोधी पुढे म्हणाला की, “रवी शास्त्री यांनी कोच म्हणून चांगलं काम केलं आहे हे आपण मान्य करायला हवं, पण त्यांचा करार आता संपत आहे. माझ्या मते सध्याच्या परिस्थितीमध्ये द्रविड श्रीलंकेला टीमसोबत जात असेल तर तो भावी काळात शास्त्रीच्या पदाचा दावेदार आहे. सध्या रवी शास्त्रींची कुणी जागा घेऊ शकत असेल तर ती व्यक्ती राहुल द्रविडच आहे.” असे सोधीने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.