Home /News /sport /

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल ‘इतक्या’ कालावधीसाठी आऊट

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल ‘इतक्या’ कालावधीसाठी आऊट

टीम इंडियाची पहिली टेस्ट 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणार आहे. या टेस्टपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचा दुसरा सिझन सुरु होईल. या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

    मुंबई, 2 जुलै: टीम इंडियाची पहिली टेस्ट 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणार आहे. या टेस्टपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचा दुसरा सिझन सुरु होईल. या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलची (Shubman Gill) पायाची दुखापत गंभीर असून त्यामुळे त्याला किमान दोन महिने क्रिकेट खेळता येणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शुभमन गिलच्या पायाला फॅक्चर झालं आहे. त्यामुळे तो ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या तीन टेस्टमध्ये त्याला खेळता येणार, हे नक्की आहे. त्याचबरोबर त्यानंतर सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या दोन टेस्टसाठी फिट होण्यासाठी देखील त्याच्याकडे फार वेळ नाही.” अशी माहिती या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. शुभमन गिलची दुखापत साऊथमप्टन टेस्टच्या दरम्यान बळावली अशी माहिती आता समोर आली आहे.  साऊथम्प्टन टेस्टमध्ये  भारताचा आठ विकेट्सनं पराभव झाला होता. भारताच्या माजी फास्ट बॉलरनं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार ‘शुभमन गिलला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, ती गंभीर नसली तरी त्यासाठी विश्रांतीची गरज आहे. या दुखापतीमधून बरं होण्यासाठी आठ ते दहा आठवड्यांचा कालावधी लागतो. गिलचा पर्याय असलेले मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी चांगली कामगिरी केली तर त्याला संपूर्ण मालिका बाहेर बसावं लागू शकतं. गिलला पाचव्या टेस्टमध्ये खेळवण्याची घाई टीम मॅनेजमेंट करणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. भारताविरुद्ध धोका पत्करणार नाही; टेस्ट सीरिजपूर्वी इंग्लंडच्या कॅप्टनने सांगितलं टीमनिवडीचं धोरण या दुखापतीचे स्वरुप निश्चित झाल्याने शुभमन गिल इंग्लंडमध्ये राहणार आहे की भारतामध्ये परत येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तो भारतामध्ये परतल्यास स्टँडबाय ओपनिंग बॅट्समन अभिमन्यू इश्वरनचा भारतीय टीममध्ये समावेश होईल. भारतीय क्रिकेट टीम सध्या ब्रेकवर असून 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, India vs england, Sports, WTC ranking

    पुढील बातम्या