• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • टीम इंडियाच्या क्रिकेटपटूला व्हायचं आहे ‘मिस्टर इंडिया’, वाचा काय आहे कारण

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूला व्हायचं आहे ‘मिस्टर इंडिया’, वाचा काय आहे कारण

अनिल कपूरचा (Anil Kapoor) मिस्टर इंडिया (Mr. India) हा सिनेमा 1980 च्या दशकात चांगलाच गाजला होता. मिस्टर इंडियातील अरुण वर्मा म्हणजेच अनिल कपूर सारखं काही काळ गायब होण्याची इच्छा अनेकांची असते.

 • Share this:
  मुंबई, 19 जून : अनिल कपूरचा (Anil Kapoor) मिस्टर इंडिया (Mr. India) हा सिनेमा 1980 च्या दशकात चांगलाच गाजला होता. या सिनेमात अनिल कपूर हातामधील घड्याळाचं बटण दाबलं की गायब होत असे. मिस्टर इंडियातील अरुण वर्मा म्हणजेच अनिल कपूर सारखं काही काळ गायब होण्याची इच्छा अनेकांची असते. टीम इंडियाचा ऑल राऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) त्यापैकीच एक आहे. सुंदरची गायब होण्याची इच्छा देखील क्रिकेटशी संबंधित आहे. आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा सुंदर सदस्य आहे. सुंदरनं ‘क्रिकइन्फो’ सोबत केलेल्या एका व्हिडीओ चॅटमध्ये याचा खुलासा केला आहे. ‘तुला सुपर पॉवर मिळाली तर काय करशील?’ असा प्रश्न सुंदरला विचारला होता त्यावेळी त्याने मला गायब होण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. सुंदरनं याचं कारण सांगताना म्हणाला की, “प्रतिस्पर्धी टीमच्या ड्रेसिंग रुमध्ये घुसून त्यांचे रहस्य समजण्यासाठी मला ही सुपर पॉवर हवी आहे. ब्रायन लारा आणि महेंद्रसिंह धोनी हे आपले आयडॉल असल्याचं सुंदरनं यावेळी सांगितलं. तसंच वडिलांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक महागडे घड्याळ आणि कार देण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. WTC Final: टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये 'एक' बदल करा, गावसकरांची सूचना तामिळनाडू कडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सुंदरनं आजवर चार टेस्ट एक वन-डे आणि 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने टेस्टमध्ये 6, वन-डे मध्ये एक आणि टी20 मध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरनं त्याच्या टेस्ट करियरमध्ये 265 रन काढले आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या 20 सदस्यीय टीमचा सुंदर सदस्य आहे.
  Published by:News18 Desk
  First published: