मुंबई, 31 जानेवारी : वजन कमी करणे हा अनेकांचा संकल्प असतो. ते कमी करण्यासाठी बऱ्याचदा सुरूवातही करतात. पण नंतर काही कारणांमुळे अनेकांचा तो संकल्प पूर्ण होत नाही. त्या सर्वांना भारतीय क्रिकेट टीममधील (Team India) खेळाडूच्या पत्नीनं उदाहरण वाचून प्रेरणा मिळू शकते. टीम इंडियातील क्रिकेटपटू मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने त्याच्या पत्नीचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मयंकनं त्याची पत्नी अशिता सूदचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं साधारण पाच महिन्यांमध्ये 12.8 किलो वजन कमी केलं आहे. मयंकनं शेअर केलेला एक फोटो 15 सप्टेंबर 2021 चा तर दुसरा 31 जानेवारी 2022 चा आहे. दोन्ही फोटो शेअर करत अशितानं वजन कसं कमी केलं ते त्यानं सांगितलं आहे. ‘संकल्प केला होता. त्याप्रमाणे भरपूर कष्ट केले. एक-एक टार्गेट पूर्ण केले आणि आता त्याचा परिणाम तुम्ही सर्व जण पाहू शकता 15 सप्टेंबर ते 31 जानेवारी दरम्यान 12.8 किलो वजन कमी केले आहे.’
मयंकनं शेअर केलेला हा फोटो पाहून रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) प्रभावित झाली आहे. ‘तुझा अभिमान आहे’, अशी प्रतिक्रिया रितिकानं दिली आहे. मयांक आणि अशिता यांनी सात वर्ष डेट केल्यानंतर जून 2018 मध्ये लग्न केले. अशिता वकील आहे. आंद्रे रसेल टीमसह करत होता प्रॅक्टीस आणि मैदानात अचानक उतरले हेलिकॉप्टर! खेळाडूंमध्ये गोंधळ मयंक अग्रवालनं टीम इंडियाकडून आजवर 19 टेस्ट आणि 5 वन-डे खेळल्या आहेत. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही मयंक खेळला होता. पण, या सीरिजमध्ये तो फारसा यशस्वी ठरला नाही. आयपीएल 2022 पूर्वी पंजाब किंग्जनं (Punjab Kings) मयंकला रिटेन केले आहे.