जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BPL 2022: आंद्रे रसेल टीमसह करत होता प्रॅक्टीस आणि मैदानात अचानक उतरले हेलिकॉप्टर! खेळाडूंमध्ये गोंधळ

BPL 2022: आंद्रे रसेल टीमसह करत होता प्रॅक्टीस आणि मैदानात अचानक उतरले हेलिकॉप्टर! खेळाडूंमध्ये गोंधळ

BPL 2022: आंद्रे रसेल टीमसह करत होता प्रॅक्टीस आणि मैदानात अचानक उतरले हेलिकॉप्टर! खेळाडूंमध्ये गोंधळ

क्रिकेटपटू मैदनात प्रॅक्टीस करत आहेत त्याचवेळी तिथं अचानक हेलिकॉप्टर उतरलं तर काय होईल? मैदानात गोंधळ होईल हे स्पष्ट आहे. बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2022) मधील टीमच्या बाबतीत हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी: क्रिकेटपटू मैदनात प्रॅक्टीस करत आहेत त्याचवेळी तिथं अचानक हेलिकॉप्टर उतरलं तर काय होईल? मैदानात गोंधळ होईल हे स्पष्ट आहे. बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2022) मधील टीमच्या बाबतीत हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. या टीमचे खेळाडू मैदानात प्रॅक्टीस करत होते, त्यावेळी मैदानात अचानक हेलिकॉप्टर उतरले. एकमद घडलेल्या घटनेमुळे खेळाडूंमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. त्यानंतर सर्व खेळाडू धुळीपासून वाचण्यासाठी मैदानात इकडं-तिकडं पळू लागले. बीपीएलमधील मिनिस्टर ग्रुप ढाका (Minister Group Dhaka) या टीमच्या बाबतीत हा प्रकार घडला. चट्टाग्राममधील एमए अजीज स्टेडियमवर ही घटना घडली. हेलिकॉप्टर मैदानात उतरले तेव्हा मिनिस्टर ग्रुप ढाका टीमचे आंद्रे रसेल (Andre Russell), तमिम इक्बाल, मशरफे मुर्तझा हे प्रमुख खेळाडू प्रॅक्टीस करत होते. मीडियातील वृत्तानुसार, रविवारी दुपारी 1 वाजता हा प्रकार घडला. खेळाडूंना कोणतीही कल्पना नसताना हेलिकॉप्टर मैदानात उतरले. त्यामुळे खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काय होते कारण? या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरचा वापर एअर अ‍ॅम्बूलन्स म्हणून केला जात होता. एका गंभीर आजारी रूग्णाला एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर मैदानात उतरवण्यात आले. जिल्हा कमिशनरकडून याबाबतची परवानगी घेण्यात आली होती. तसेच त्यांनी जिल्हा क्रीडा असोसिएशनलाही याची माहिती दिली होती. पण, बांगलादेश प्रीमियर लीगचे आयोजक आणि मिनिस्टर ग्रुप ढाका टीमसा याची कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे प्रॅक्टीस सुरू असताना एकदम घडलेला प्रकार पाहून त्यांचा गोंधळ उडाला. U19 World Cup 2022: CRPF जवानाचा मुलगा ठरला देशाचा हिरो, वडिलांची भावुक प्रतिक्रिया चट्टाग्राम जिल्हा क्रीडा सचिव शहाबूद्दीन शमीम यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘मानवी भूमिकेतून हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. आम्ही क्रिकेट बोर्डाला याची माहिती यापूर्वीच दिली होती. हेलिकॉप्टरचे लँडींग हे मैदानाच्या पूर्व भागात होणार होते. पण, ते पश्चिम भागात खेळाडू प्रॅक्टीस करत होते, तिथं उतरलं. त्यामुळे सर्वजण घाबरले.’ असा दावा त्यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात