मुंबई, 11 मार्च : दीपक चहर (Deepak Chahar), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सह टीम इंडियाचे अनेक प्रमुख खेळाडू गेल्या काही दिवसांमध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत. या जखमी खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. खेळाडूंच्या दुखापती रोखण्यासाठी गंभीर उपाय करण्याचा निर्णय हेडकोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) केला आहे. टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) बदली होणार आहे. ‘क्रिकबझ’नं हे वृत्त दिलं आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्याातील सीरिजनंतर ही बदली होणार आहे. पटेल यांचे प्रमोशन होऊन त्यांना एनसीएमध्ये ‘स्पोर्ट्स सायन्स अँड मेडिसिन हेड’ हे पद मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या फिजियोथेरेपिस्ट पदासाठी काही दिवसांपूर्वीच अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे देखील पटेल यांची एनसीएमधील बदली नक्की मानली जात आहे. द्रविडच्या सल्ल्यानंतर निर्णय नितीन पटेल यांची एनसीएमधील बदली राहुल द्रविडच्या सल्ल्यानुसार करण्यात आली असल्याचं मानलं जात आहे. भारतीय खेळाडूंमध्ये दुखापतीचं प्रमाण वाढल्यानं द्रविड सध्या काळजीत आहे. त्यामुळे अनुभवी आणि एस्पर्ट असलेले नितिन पटेल हे एनसीएमधील पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचं मत टीम मॅनेजमेंटनं व्यक्त केलं आहे. ICC चा पाकिस्तानला मोठा धक्का, ऐतिहासिक सीरिजमध्ये ओढावली नामुश्की आगामी 18 महिन्यांमध्ये 2 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहेत. तसंच टीम इंडियाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रकही भरगच्च आहे. त्यामुळे श्रीलंका सीरिजनंतर तातडीने पटेल यांची एनसीएमध्ये बदली करण्यात येणार आहे. सध्या टीम इंडियात नितिन पटेल आणि योगेश परमार हे दोन फिजियो आहेत. यापैकी परमार यापुढील काळात देखील टीमसोबत राहतील. तर पटेल यांच्या जागी नव्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.