मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC चा पाकिस्तानला मोठा धक्का, ऐतिहासिक सीरिजमध्ये ओढावली नामुश्की

ICC चा पाकिस्तानला मोठा धक्का, ऐतिहासिक सीरिजमध्ये ओढावली नामुश्की

ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या टेस्टनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) नामुश्की ओढावली आहे.

ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या टेस्टनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) नामुश्की ओढावली आहे.

ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या टेस्टनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) नामुश्की ओढावली आहे.

    मुंबई, 11 मार्च : ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या सीरिजमधील रावळपिंडीमध्ये झालेली पहिली टेस्ट (Pakistan vs Australia) ड्रॉ झाली. 5 दिवस चाललेल्या या मॅचमध्ये फक्त 14 विकेट्स पडल्या आणि 1187 रन निघाले. या प्रकारच्या पिचनं टेस्ट क्रिकेटला चालना मिळणार नाही, अशी कबुली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आयसीसीनं (ICC) पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. रावळपिंडी टेस्टसाठी वापरण्यात आलेले पिच सरासरीपेक्षा खराब होते, असं मत आयसीसीनं व्यक्त केलं आहे. तसंच या पिचला एक डिमेरीट पॉईंट देखील दिला आहे. आयसीसीच्या नियमानुसार 5 वर्षांमध्ये कोणत्याही पिचला 5 डिमेरिट पॉईंट मिळाले तर त्या पिचवर 12 महिन्यांची बंदी घातली जाते. बंदीच्या कालावधीमध्ये तिथं कोणताही आंतरराष्ट्रीय मॅच खेळता येत नाही. रावळपिंडी टेस्टमधील मॅच रेफ्री रंजन मदुगले  (Ranjan Madugalle) यांनी ही कारवाई केली आहे.  आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये त्यांचा समावेश आहे. मदुगले यांनी सांगितलं की, '5 दिवसांतच्या खेळामध्ये पिचमध्ये क्वचितच बदल झाला. फक्त थोडा बाऊन्स कमी झाला होता. या पिचवर फास्ट बॉलर्सना जास्त मदत मिळाली नाही. तसंच स्पिनर्सससाठीही काही खास नव्हतं. माझ्या मते रावळपिंडीच्या पिचवर बॅट आणि बॉलमध्ये समान स्पर्धा दिसली नाही. त्यामुळे आयसीसीच्या नियमांच्या आधारे या पिचला सरासरीपेक्षा कमी पॉईंट देत आहे. मी हा रिपोर्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही पाठवला आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले. MCC ने नियम बदलला, पण बॅटरवरच भडकला डेव्हिड वॉर्नर पाकिस्ताननं गमावल्या फक्त 4 विकेट्स रावळपिंडी टेस्टमध्ये पाकिस्ताननं फक्त 4 विकेट्स गमावल्या. यजमान टीमनं पहिली इनिंग 4 आऊट 476 रनवर घोषित केली. इमान उल हक आणि अझहर अलीनं पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 459 रन करत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं.  उस्मान ख्वाजनं 97 तर मार्नस लबुशेननं 90 रन काढले. पाकिस्ताननं दुसऱ्या इनिंगमध्ये बिनबाद 252 रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये इमाम उल हक आणि अब्दुल्लाह शफीक यांनी शतक झळकावले. या सीरिजमधील दुसरी टेस्ट 12 मार्चपासून कराचीमध्ये सुरू होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Icc, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या