जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : वन-डे टीमची घोषणा लवकरच, रोहित शर्माच्या निवडीबाबत वाचा Update

IND vs SA : वन-डे टीमची घोषणा लवकरच, रोहित शर्माच्या निवडीबाबत वाचा Update

IND vs SA : वन-डे टीमची घोषणा लवकरच, रोहित शर्माच्या निवडीबाबत वाचा Update

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्ट आता संपली आहे. त्यानंतर आता लवकरच वन-डे मालिकेसाठी (ODI) टीम इंडियाची घोषणा होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 डिसेंबर :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्ट आता संपली आहे. निवड समिती या दोन दिवसांमध्ये (31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी) वन-डे टीमची घोषणा करू शकते. 19 जानेवारीपासून दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वन-डे मालिका होणार आहे. वन-डे टीमचा नवा कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसचा संभ्रम अजूनही कायम आहे. रोहितच्या फिटनेसचा रिपोर्ट आलेला नसल्यानंच अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. ‘इनसाईड स्पोर्ट्स’नं बीसीसीआयच्या सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार वन-डे टीमची निवड दोन दिवसांमध्ये होणार आहे. निवड समितीला सध्या रोहितच्या फिटनेस टेस्टची प्रतीक्षा आहे. रोहित संपूर्ण फिट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) प्राथमिक टेस्ट पास झाल्याची माहिती आहे, पण तो 100 टक्के फिट होण्याची निवड समिती वाट पाहात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीमची घोषणा करताना रोहित शर्माला वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि तो टेस्ट सीरिजसाठी आफ्रिकेला जाऊ शकला नाही. रोहित वन-डे सीरिज देखील खेळू शकला नाही तर केएल राहुल (KL Rahul) या टीमची कॅप्टनसी करेल. कोणत्या खेळाडूंवर फोकस? दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी ओपनिंग बॅटर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांची निवड होण्याची शक्यता आहे. या दोघांनीही विजय हजारे स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. गायकवाडनं 5 मॅचमध्ये 150.75 च्या सरासरीनं 603 रन केले, यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे. ब्रेट ली चा जलवा आजही कायम, क्रिकेट मॅचमध्ये उडवली मुलाची दांडी! VIDEO व्यंकटेश अय्यरनंही या स्पर्धेत 70 पेक्षा जास्त सरासरीनं रन करत दावेदारी सादर केली आहे. त्याचबरोबर अनुभवी बॅटर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) भवितव्याचा निर्णय देखील होणार आहे. धवनसाठी विजय हजारे स्पर्धा निराशाजनक ठरली. मात्र 2021 या वर्षात तो टीम इंडियाकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा बॅटर आहे, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा निवड समिती संधी देणार का?  हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात