मुंबई, 18 डिसेंबर : भारतीय वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी असल्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. सध्या तो बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुढील उपचार घेत आहे. या क्रिकेट अकदामीमध्ये सध्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीम इंडियाचा कँप सुरू आहे. रोहित या कँपमध्ये सहभागी झाला. त्याने या खेळाडूंना चॅम्पियन होण्याच्या टिप्स दिल्या. विशेष म्हणजे ज्या अंडर 19 टीमला रोहितनं टीप्स दिल्या. त्याच गटातील खेळाडूंसोबत हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) 2008 साली वर्ल्ड कप जिंकला आहे. बीसीसीआयनं हा फोटो शेअर केला आहे. ‘टीम इंडियाचा व्हाईट बॉल कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या उपचारादरम्यान आशिया कप स्पर्धेची तयारी करणाऱ्या अंडर 19 टीमशी संवाद साधला.’ असे कॅप्शन बीसीसीआयनं या फोटोंना दिले आहे.
Priceless lessons 👍 👍
— BCCI (@BCCI) December 17, 2021
📸 📸 #TeamIndia white-ball captain @ImRo45 made most of his rehab time as he addressed India’s U19 team during their preparatory camp at the NCA in Bengaluru. pic.twitter.com/TGfVVPeOli
रोहितचं लक्ष्य रोहित शर्माला (Rohit Sharma) मागच्या आठवड्यात विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) भारताच्या वनडे टीमचा कर्णधार करण्यात आलं. याशिवाय त्याची टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदावरही नियुक्ती करण्यात आली, पण हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहित तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळू शकणार नाही. 26 डिसेंबरपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. रोहितला फिट होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा वेळ लागणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा पहिल्या वनडेसाठी फिट होईल, अशी शक्यता आहे. या सीरिजसाठी फिट होणे हे रोहितचे लक्ष्य असून त्यासाठी तो क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. तुम्ही यांना ओळखता का? विनोद कांबळीनं शेअर केला मित्रांसोबतचा जुना फोटो रोहित शर्माऐवजी भारतीय ए टीमचा कर्णधार प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याला टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. पण दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टेस्टमध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोघंच ओपनिंग करतील, असे टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) यापूर्वीच स्पष्ट केले आहे.