मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित शर्मा NFT च्या माध्यमातून देणार फॅन्सना खास गिफ्ट, वाचा एनएफटी म्हणजे काय?

रोहित शर्मा NFT च्या माध्यमातून देणार फॅन्सना खास गिफ्ट, वाचा एनएफटी म्हणजे काय?

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन (Non Fungible Token- NFT) मार्केटमध्ये दाखल झालेला नवा सेलिब्रेटी बनला आहे.

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन (Non Fungible Token- NFT) मार्केटमध्ये दाखल झालेला नवा सेलिब्रेटी बनला आहे.

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन (Non Fungible Token- NFT) मार्केटमध्ये दाखल झालेला नवा सेलिब्रेटी बनला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 डिसेंबर : टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन (Non Fungible Token- NFT) मार्केटमध्ये दाखल झालेला नवा सेलिब्रेटी बनला आहे. रोहितचे NFT कलेक्शन फेनक्रेजवर लॉन्च होणार आहे. त्याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित एनएफटीच्या माध्यमातून फॅन्सना त्याच्या ऐतिहासिक खेळीच्या संबंधातील खास गोष्टींचे डिजिटल मालकी हक्क देऊ शकतो. रोहितच्या कंपनीच्या माध्यमातून हे काम करणार आहे, ती कंपनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलची (ICC) अधिकृत पार्टनर बनली आहे.

रोहित शर्माने या विषयावर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, 'मी माझ्या कारकिर्दीमधील काही खास क्षण फॅन्ससोबत शेअर करण्यासाठी आतुर आहे. मी सुपर-कुल हिटमॅन एनएफटी आणि 2 डी तसंच 3डी अवतारासाठी फार वाट पाहू शकत नाही. येत्या काही महिन्यात हे सर्व फॅन्ससाठी उपलब्ध असेल.'

रोहितच्या या निर्णयामुळे फॅन्सना त्याच्या कारकिर्दीमधील खास गोष्टींचा डिजिटल संग्रह करता येणार आहे. रोहितनं वन-डेमध्ये 3 द्विशतकं झळकावली आहेत. 2019 च्या वर्ल्ड कपमधील त्याची गोल्डन बॅट तसेच आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून हॅट्ट्रिक घेतली तो बॉल या सर्व गोष्टी आगामी NFT चा भाग असतील.

रोहित शर्मापूर्वी युवराज सिंहनं (Yuvraj Singh) NFT कलेक्शन लॉन्च केले आहे. त्यामुळे हे एनएफटी म्हणजे काय आणि त्या माध्यमातून मालकी हक्क कसे मिळवता येतात हे माहिती असणे आवश्यक आहे.

NFT म्हणजे काय?

NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन. डिजिटल विश्वात एखादे साहित्य किंवा ठेव्याची ही खास ओळख आहे. हा ठेवा पेन्टिंग, म्युझिक, व्हिडीओ किंवा अन्य कोणत्याही प्रकराचा असू शकतो. एनएफटीच्या माध्यमातून तुम्ही याची खरेदी किंवा विक्री करू शकता. त्याच्या बदल्यात तुम्हाला डिजिटल टोकन दिले जाते. त्याला एनएफटी म्हणतात.

लज्जास्पद! अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा क्रिकेटपटूवरील आरोप सिद्ध, कोर्टाने सुनावली शिक्षा

ही लिलावाची नवी पद्धत आहे. या माध्यमातून एखाद्या गोष्टीची कॉपी होऊ नये म्हणून NFT मार्फत कमाई केली जाते. हा सर्व व्यवहार फक्त डिजिटल माध्यमातून होतो. पारंपारिक पद्धतीनं करता येत नाही. त्याचबरोबर याची कोणतीही चोरी किंवा कॉपी करता येणार नाही याची योग्य खबरदारी घेतली जाते. त्यामुळे हा एकप्रकारे कॉपी राईट हक्क आहे.

First published:

Tags: Cricket news, Rohit sharma