मुंबई, 23 डिसेंबर : पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शहावर (Yasir Shah) 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच क्रिकेट विश्वाची मान खाली घालणारे आणखी एक प्रकरण उघड झालं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटून आरोन समर्सला (Aaron Summers) अल्पवयीन मुलांचे शोषण केल्याच्या प्रकरणात 3 वर्ष 11 महिने जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या 25 वर्षांच्या क्रिकेटपटूवर स्थानिक कोर्टात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात खटला सुरू होता. त्या तपासात त्याच्याकडे मुलांचे शोषण करणारे व्हिडीओ, तसेच फोटो सापडले आहेत. आरोन 10 मुलांच्या संपर्कात होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक साहित्य बाळगणे तसेच एका मुलाला फितवण्याचा आरोप सिद्ध झाला आहे. अल्पवयीन मुलांना ब्लॅकमेल करण्यासाठी तो या साहित्याचा वापर करत असे, असा ठपका कोर्टाने ठेवला असून त्याला 3 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यामधील 2 वर्षे त्याला पॅरोल मिळणार नाही. समर्सनं बिग बॅश लीग (Big Bash League) मधील होबार्ट हुरिकेन्स तसंच पाकिस्तान सुपर लीगमधील (Pakistan Super League) कराची किंग्ज या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. पाकिस्तानात मंदिराची तोडफोड, माजी क्रिकेटपटूनं घातलं PM ना साकडं दरम्यान पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शहावरही याच पद्धतीच्या एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यासिर शाहचा मित्र फरहानने एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा एक व्हिडिओ बनवला, त्यानंतर फरहानने मुलीचं यासिर शाहसोबत बोलणं करून दिलं. एफआयआरमध्ये यासिरने मुलीला धमकी देऊन गप्प राहण्यासाठी सांगितलं. एवढच नाही तर तिच्यावर फरहानसोबत लग्न करण्यासाठीही दबाव आणला, असा यासिरवर आरोप करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.