मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियातील वादावर BCCI ची पहिली प्रतिक्रिया, विराट कोहलीवर दिलं 'हे' स्पष्टीकरण

टीम इंडियातील वादावर BCCI ची पहिली प्रतिक्रिया, विराट कोहलीवर दिलं 'हे' स्पष्टीकरण

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना (India tour of England) भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाला होता, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यावर बीसीसीआयनं (BCCI) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना (India tour of England) भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाला होता, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यावर बीसीसीआयनं (BCCI) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना (India tour of England) भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाला होता, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यावर बीसीसीआयनं (BCCI) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना (India tour of England) भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाला होता. या प्रकरणात भारतीय टीममधील सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांच्याकडे तक्रार केली होती, असं वृत्त बुधवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. या सर्व प्रकरणावर आता बीसीसीआयनं (BCCI) मौन सोडलं आहे.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी विराटची तक्रार करण्यात आल्याच्या वृत्ताला निराधार म्हंटलं आहे. त्याचबरोबर टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय विराटचा स्वत:चा होता. त्यामध्ये बीसीसीआयची कोणतीही भूमिका नव्हती, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

विराट कोहलीनं (Virat Kohli) 16 सप्टेंबर रोजी टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर विराटनं रोहित शर्माला (Rohit Sharma) व्हाईस कॅप्टनपदावरुन हटवण्याची मागणी निवड समितीकडं केल होती, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर  चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआयकडं विराटची तक्रार केल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं होतं.

टीम इंडियातील धुसफुस चव्हाट्यावर; या दोघांनी BCCI कडे केली विराटची तक्रार!

धूमल यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी या विषयावर बोलताना सांगितले की, 'कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं बीसीसीआयकडं लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. बीसीसीआय प्रत्येक निराधार बातम्यांवर स्पष्टीकरण देऊ शकत नाही. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये बदल होणार असल्याचं आम्ही काही ठिकाणी वाचलं. हे कुणी सांगितलं?

बीसीसीआयनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. विराटनं त्याचा निर्णय स्वत: घेतला होता. त्यानंतर त्यानं बीसीसीआयला कळवलं. आज खेळाडूंनी विराटची तक्रार बीसीसीआयकडं केल्याचं वृत्त प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मी बोर्डाच्या वतीनं सांगू इच्छितो की, या प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही.'

युझवेंद्र चहलनं दिलं निवड समितीला चोख उत्तर, यूएईमध्ये केला नवा रेकॉर्ड

'मीडियातील एका वर्गाची भारतीय क्रिकेटबद्दल सारं काही माहिती आहे, अशी समजूत आहे. पण विराट राजीनामा देण्याच्या 24 तास आधी याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. या प्रकराच्या रिपोर्टिंगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसान होत आहे,' असा दावा धूमल यांनी केला.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Virat kohli