मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: युझवेंद्र चहलनं दिलं निवड समितीला चोख उत्तर, यूएईमध्ये केला नवा रेकॉर्ड

IPL 2021: युझवेंद्र चहलनं दिलं निवड समितीला चोख उत्तर, यूएईमध्ये केला नवा रेकॉर्ड

आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलनं आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे.

आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलनं आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे.

आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलनं आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे.

दुबई, 30 सप्टेंबर : आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलकडं (Yuzvendra Chahal) दुर्लक्ष करण्यात आलं आहे. चहलनं यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलमध्ये  सातत्यपूर्ण कामगिरी करत निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (RCB vs RR) चहलनं पुन्हा एकदा चांगली बॉलिंग करत 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावला.

चहलनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 18 रन देत 2 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार देण्यात आला. टी20 वर्ल्ड कप पुढील महिन्यात ज्या पिचवर होणार आहे, त्या यूएईमध्ये चहलचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं यूएईमध्ये 24 मॅच खेळल्या असून त्यामध्ये 4 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे चहलनं भारतामध्ये 85 आयपीएल मॅच खेळल्यात. त्यामध्ये त्याला एकदाही हा 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळालेला नाही.

चहलनं या कामगिरीबद्दल बोलताना सांगितलं की, 'आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या फेजमध्ये (IPL 2021, Phase 1) मला फार विकेट्स मिळाल्या नव्हत्या. त्यानंतर मी श्रीलंकेतील सीरिजमध्ये चांगली बॉलिंग केली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. श्रीलंकेत मिळालेली लय कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न होता.'

गोळीपेक्षा तेज कोहली! राजस्थान विरुद्ध केली अफलातून फिल्डिंग, VIDEO

सेहवाग निवड समितीवर नाराज

टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये 5 स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे.  या टीममध्ये चहलच्या जागी राहुल चहरची (Rahul Chahar) निवड करण्यात आली आहे. या निर्णयावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) नाराजी व्यक्त केली आहे.

PURPLE CAP:

 ‘चहल हा भारताच्या टी-20 संघातला महत्त्वाचा घटक आहे. मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यात तो तरबेज आहे. त्यामुळे त्याला भारताच्या टी-20 संघात स्थान मिळायला हवे होते. त्याला संघात न घेण्याबाबत निवड समितीने स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सेहवागने म्हटले आहे.  युझवेंद्र चहलनं या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 11 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत.

First published:

Tags: IPL 2021, T20 world cup