जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पुजारा-रहाणेसाठी 'करो वा मरो'ची लढाई, करिअर वाचवण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर

पुजारा-रहाणेसाठी 'करो वा मरो'ची लढाई, करिअर वाचवण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर

पुजारा-रहाणेसाठी 'करो वा मरो'ची लढाई, करिअर वाचवण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे भारतीय टेस्ट टीममधील दोन दिग्गज बराच काळापासून ‘आऊट ऑफ फॉर्म’ आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे भारतीय टेस्ट टीममधील दोन दिग्गज बराच काळापासून ‘आऊट ऑफ फॉर्म’ आहेत. दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही त्यांनी निराशा केली. त्यामुळे भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) या आगामी टेस्ट सीरिजसाठी त्यांची टीम इंडियातील जागा धोक्यात आली आहे. या दोघांचे आंतरराष्ट्रीय करिअर सध्या धोक्यात आहे. हे करिअर वाचवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. पुजारा-रहाणे जोडीला फॉर्मध्ये परतण्याची आणि करिअर वाचवण्याची एक अनोखी संधी चालून आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) मोठी खेळी करत टेस्ट टीममधील दावेदारी कायम ठेवण्याची त्यांना संधी आहे. रणजी ट्रॉफीतील एलिट ग्रुपच्या मॅच 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिज 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सीरिजपूर्वी निवड समितीचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना किमान 2 संधी आहेत. अजिंक्यनं मुंबई तर पुजारानं सौराष्ट्र टीमकडून रणजी स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अहमादाबादमध्ये मुंबई विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात हे दिग्गज एकमेकांच्या विरूद्ध  खेळू शकतात. ‘अजिंक्य रहाणे निश्चितपणे सज्ज आहे. आम्ही अनेकदा भेटलो आहोत. तो मुंबई टीमसोबत सराव करत असून चांगल्या फॉर्ममध्ये आहे.’ अशी माहिती मुंबईचे कोच अमोल मजमूदार यांनी दिली आहे. ‘आम्हाला भविष्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. रणजी ट्रॉफी स्पर्धा हे आमचं लक्ष्य आहे. दोघांनाही मोठ्या खेळीची गरज आहे. त्यांना आत्मविश्वास मिळणे आवश्यक आहे. अनेकदा बॅटींगपेक्षा आत्मविश्वास हा महत्त्वाचा घटक ठरतो. एखादे मोठे शतक झळकावले तरच आत्मविश्वास परत येईल,’ असे मजमूदार यांनी स्पष्ट केले. Under 19 WC : विराट कोहलीनं फायनलपूर्वी दिला तरूण खेळाडूंना ‘गुरू-मंत्र’ सौराष्ट्रचे कोच नीरज ओडेद्रा यांनी सांगितले की, ‘पुजारा अन्य बॅटरसारखा नाही. तो नेटमध्ये येतो त्यावेळी नेहमी त्याच्याकडे खास प्लॅन असतो. तो अगदी वेगळ्या पद्धतीनं ट्रेनिंग करतो. सध्या रिव्हर्स स्विंगवर सराव करण्याची त्याची योजना आहे. भारत-श्रीलंका सीरिजमध्ये त्याला त्याचा सामना करावा लागू शकतो.’ बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही या दोन्ही खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळून फॉर्ममध्ये येण्याची सूचना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात