Home /News /sport /

IND vs ENG : रोहित शर्मानं सुरू केली इंग्लंड दौऱ्याची तयारी, पाहा Photo

IND vs ENG : रोहित शर्मानं सुरू केली इंग्लंड दौऱ्याची तयारी, पाहा Photo

आयपीएल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माचं (Rohit Sharma) लक्ष्य पुढील महिन्यात इंग्लंड विरूद्ध होणारी टेस्ट मॅच आहे. रोहितनं या टेस्टची तयारी सुरू केली आहे.

    मुंबई, 6 जून : आयपीएल स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माचं (Rohit Sharma) लक्ष्य पुढील महिन्यात इंग्लंड विरूद्ध होणारी टेस्ट मॅच आहे.  भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच टेस्ट मॅचच्या मालिकेतील ही शेवटची टेस्ट आहे. मागील वर्षी भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्यात कोरोनाचा स्फोट झाल्यानं ही टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. यापूर्वी झालेल्या 4 टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाकडं 2-1 अशी आघाडी आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच विदेशात टेस्ट खेळणार आहे. ही टेस्ट जिंकून 2007 नंतर इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी भारतीय टीमला आहे. त्यामुळे रोहित कामाला लागला आहे. रोहितनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. आयपीएल स्पर्धेनंतर रोहित पहिल्यांदाच मैदानात उतरला आहे. आयपीएल स्पर्धेनंतर रोहितनं विश्रांती घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेत भारतीय टीमचा कॅप्टन आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं आव्हान लवकर संपुष्टात आल्यानं रोहितला मोठा ब्रेक मिळालाय. आता 1 जूलैपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाला दमदार सुरूवात करून देण्याची जबाबदारी रोहितवर आहे. खेळ बदला किंवा बाहेर जा! कपिल देव यांनी टीम इंडियातील सिनिअर खेळाडूंना सुनावलं आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच रोहितला या मोसमात एकही अर्धशतक करता आलेलं नाही. मुंबईने आयपीएलच्या 15व्या मोसमात अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला, या सामन्यात मुंबईचा विजय झाला तरी रोहितची कामगिरी निराशाजनक झाली. 13 बॉलमध्ये 2 रन करून रोहित आऊट झाला. आयपीएल 2022 मध्ये रोहितने 14 इनिंगमध्ये 19.14 च्या सरासरीने 268 रन केले, या दरम्यान त्याचा सर्वाधिक स्कोअर 48 रन होता.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या