मुंबई, 21 जानेवारी : टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेलनं (Axar Patel) त्याची गर्लफ्रेंड मेहा सोबत साखरपुडा (Axar Patel Engagement) केला आहे. अक्षरनं स्वत: सोशल मीडियावर याचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. अक्षरचा काल (20 जानेवारी) वाढदिवस होता. या वाढदिवशी त्याने मेहाला प्रपोज केले आणि त्यानंतर साखरपुडा केला. आज आयुष्याची नवी सुरूवात करत आहे. आज आणि नेहमीच मी तुझ्यावर प्रेम करेन. अशी भावना अक्षरनं यावेळी व्यक्त केली आहे. अक्षरनं वाढदिवशीच या साखरपुड्याची तयारी केली होती, याचा अंदाज हे फोटो पाहून करता येईल. अक्षरनं हे फोटो शेअर करताच त्याला फॅन्स तसेच सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Today is the new beginning of our life 💍
— Akshar Patel (@akshar2026) January 20, 2022
"Together & Forever".
Love you till eternity♥️♾ pic.twitter.com/gfOTDF0DB2
अक्षर पटेलनं दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. तो श्रीलंका विरुद्धच्या सीरिजमध्येही खेळण्याची शक्यता कमी आहे. अक्षरसाठी मागचे वर्ष जबरदस्त ठरले. त्याने इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सीरिजमधील 3 टेस्टमध्ये अक्षरने 27 विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडियाने ती सीरिज 3-1 ने जिंकली. Legends League Cricket : युसूफचा ‘पठाणी’ हिसका, इंडिया महाराजाचा दमदार विजय अक्षरनं न्यूझीलंड विरुद्ध मागच्या वर्षी कानपूरमध्ये झालेल्या टेस्टमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच मुंबई टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्या टेस्टच्या दरम्यानच अक्षर जखमी झाला. तेव्हापासून तो टीमच्या बाहेर आहे. अक्षरला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमने रिटेन केलेले आहे.