Home /News /sport /

Legends League Cricket : युसूफचा 'पठाणी' हिसका, इंडिया महाराजाचा दमदार विजय

Legends League Cricket : युसूफचा 'पठाणी' हिसका, इंडिया महाराजाचा दमदार विजय

वेगवेगळ्या देशातील निवृत्त झालेल्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पुन्हा एकदा पाहण्याची संधी देणारी लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धा (Legends League Cricket 2022) सुरू झाली आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस युसूफ पठाणने (Yusuf Pathan) गाजवला.

    मुंबई, 21 जानेवारी : वेगवेगळ्या देशातील निवृत्त झालेल्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पुन्हा एकदा पाहण्याची संधी देणारी लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धा (Legends League Cricket 2022) ओमानमधील मस्कतमध्ये सुरू झाली आहे. या स्पर्धेत गुरूवारी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या इंडिया महाराजा टीमने आशिया लॉयन्सचा (India Maharaja vs Asia Lions) टीमचा 6 विकेट्सने पराभव केला. माजी भारतीय ऑल राऊंडर युसूफ पठाणची (Yusuf Pathan) वादळी खेळी हे या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. युसूफने 40 बॉलमध्ये 80 रनची खेळी करत मॅचचं चित्र बदललं. त्याने फक्त 28 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. तसेच या खेळीत त्याने 5 सिक्स आणि 9 फोर लगावले. युसूफला कॅप्टन मोहम्मद कैफनं 37 बॉलमध्ये 42 रन करत भक्कम साथ दिली. या दोघांनी टीमच्या खराब सुरूवातीनंतरही विजय खेचून आणला. यापूर्वी आशिया लायन्सकडून उपूल थरंगानं 66 तर कॅप्टन डॅरेन सॅमीने 44 रन काढले. महाराजा टीमकडून मनप्रीत गोनीनं 3 आणि इराफान पठाणने 2 विकेट्स घेतल्या. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या लॉयन्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 175 रन केले होते. 176 रनचा पाठलाग करताना महाराजा टीमची सुरूवात खराब झाली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये स्टुअर्ट बिन्नी आऊट झाला. त्यानंतर बद्रीनाथ खातं उघडण्यापूर्वीच परतला. त्यापाठोपाठ नमन ओझाचीही विकेट गेल्यानं महाराजा टीमची 6.1 ओव्हरनंतर अवस्था 3 आऊट 34 अशी झाली होती. त्यानंतर कैफ आणि पठाण जोडीने टीमला सावरत विजय मिळवून दिला. IPL 2022: आयपीएल मेगा ऑक्शनसाठी BCCI करणार आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल या स्पर्धेत इंडिया महाराजा (India Maharajas), एशिया लायन्स आणि वर्ल्ड जाएंट्स (World Giants) या तीन टीम सहभागी होणार आहेत. या तिन्ही टीममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज सहभागी होणार आहेत. 9 दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Yusuf pathan

    पुढील बातम्या