जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Team India 1000 ODI: भारताची पहिल्या वन-डे मध्ये काय होती Playing 11? वाचा 48 वर्षांपूर्वीचा इतिहास

Team India 1000 ODI: भारताची पहिल्या वन-डे मध्ये काय होती Playing 11? वाचा 48 वर्षांपूर्वीचा इतिहास

Team India 1000 ODI: भारताची पहिल्या वन-डे मध्ये काय होती Playing 11? वाचा 48 वर्षांपूर्वीचा इतिहास

भारताने पहिली वन-डे मॅच 48 वर्षांपूर्वी 1974 साली (Team India 1st ODI) खेळली होती. त्या मॅचचा इतिहास आता खूप कमी जणांच्या लक्षात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 फेब्रुवारी: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील रविवारी होणारी वन-डे मॅच ही ऐतिहासिक आहे. टीम इंडियाची ही एक हजारावी वन-डे मॅच असेल. टीम इंडिया वन-डे क्रिकेटच्या इतिहासात 1000 चा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरणार आहे.  भारताने पहिली वन-डे मॅच 48 वर्षांपूर्वी 1974 साली खेळली होती. त्या मॅचचा इतिहास आता खूप कमी जणांच्या लक्षात आहे. काय होती Playing 11? भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 13 जुलै 1974 रोजी ही ऐतिहासिक मॅच झाली होती. भारतीय टीम तेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. इंग्लंडमधील लीड्स ग्राऊंडवर ही ऐतिहासिक मॅच झाली. या वन-डे मॅचपूर्वी भारताने टेस्ट सीरिज 0-3 या फरकाने गमावली होती. त्यामुळे टीम इंडिया मोठ्या दबावात होती. पहिल्या वन-डे सामन्यातील टीम इंडियाच्या प्लेईंग 11 (Playing 11) मध्ये सुनील गावसकर आणि सुधीर नाईक ही ओपनिंग जोडी होती. मिडल ऑर्डरमध्ये अजित वाडेकर, गुंडप्पा विश्वनाथ, फारूख इंजिनिअर आणि ब्रिजेश पटेल यांचा समावेश होता. यापैकी इंजिनिअर हे विकेटकिपर - बॅटर होते. एकनाथ सोलकर हे टीममधील ऑल राऊंडर होते. तर सय्यद अली, मदनलाल, व्यंकटराघवन आणि बिशन सिंग बेदी या बॉलर्सचा टीममध्ये समावेश होता. पहिल्या मॅचचा इतिहास टेस्ट सीरिजमधील नामुष्कीदायक पराभवानंतर भारतीय टीम तेव्हा क्रिकेटमध्ये अगदीच नव्या असलेल्या वन-डे फॉर्मेटमधील पहिल्या मॅचला सामोरी गेली. एकूण 55 ओव्हर्सच्या त्या मॅचमध्ये भारतीय टीमनं चांगला प्रतिकार केला. भारताने पहिल्यांदा बॅटींग करत 53.5 ओव्हर्समध्ये 265 रन केले. भारताकडून ब्रिजेश पटेलनं (Brijesh Patel) सर्वाधिक 82 रन केले. तर कॅप्टन अजित वाडेकरनं (Ajit Wadwkar) 67 रनची खेळी केली. सुनील गावसकरनं 28 तर फारूख इंजिनिअरनं 32 रनचं योगदान दिलं. इंग्लंडनं 266 रनचे आव्हान जवळपास 4 ओव्हर्स आणि 4 विकेट्स राखत पूर्ण केले. जॉन एड्रिज ‘मॅन ऑफ द मॅच’ चा मानकरी ठरला. त्याने सर्वाधिक 90 रन काढले. भारताकडून बिशनसिंग बेदी आणि एकनाथ सोलकर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 3 महिन्यांत वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस जिंकून देणाऱ्या ऑस्ट्रेलियन कोचचा राजीनामा 8 वर्षांनंतर बदलला इतिहास इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन-डेमध्ये भारताने आश्चर्यकारक बदल करत बिशन सिंग बेदी आणि व्यंकटराघवन यांना प्लेईंग 11 मधून वगळले. टीम इंडियानं बॅटींग मजबूत केली. त्यानंतरही मॅचचा निकाल बदलला नाही. भारतीय टीमची वन-डे क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरी यापुढील काळातही सुरू होती. 1975 आणि 1979 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम पहिल्याच फेरीत आऊट झाली. 1983 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मात्र परिस्थिती बदलली. कपिल देवच्या (Kapil Dev) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या वर्ल्ड कप विजेतेपदानंतर भारतीय क्रिकेटचा संपूर्ण इतिहास बदलला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात