मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पाकिस्ताननं केली टीम इंडियाची मदत, सेमी फायनलचा मार्ग झाला सोपा

T20 World Cup: पाकिस्ताननं केली टीम इंडियाची मदत, सेमी फायनलचा मार्ग झाला सोपा

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 टीम सेमी फायनलला जाणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ग्रुप 2 मधून टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 ऑक्टोबर : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 टीम सेमी फायनलला जाणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ग्रुप 2 मधून टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या टीम सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र त्यांना पाकिस्तान विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या ग्रुपमधील सेमी फायनलची लढाई रंगतदार बनली आहे.

पाकिस्ताननं न्यूझीलंडला पराभूत केल्यानं टीम इंडियाचा मार्ग सोपा होणार आहे. कारण आता न्यूझीलंडवरही रविवारच्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी दबाव असेल. भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळाल्यामुळे आता पाकिस्तानचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. आता पाकिस्तानचे अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याशी मॅच बाकी आहेत. त्यांचा या स्पर्धेतील फॉर्म पाहता या मॅच जिंकणे पाकिस्तानला अवघड जाणार नाही.

टीम इंडियाच्या आता न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याशी लढत बाकी आहे. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणारी लढत 'करो वा मरो' स्वरुपातील आहे. न्यूझीलंडनं मंगळवारी पाकिस्तानचा पराभव केला असता तर टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असती. आता टीमला न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर सेमी फायनलचा पुढील मार्ग सोपा होणार आहे.  त्यामुळे पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाला एकप्रकारे मदत केली आहे.

T20 World Cup PAK vs NZ: गोळीच्या वेगानं जाणाऱ्या बॉलवर झेपावत पकडला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

टीम इंडियाचे उर्वरित सामने

31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30 वाजता

3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता

8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup