• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup PAK vs NZ: गोळीच्या वेगानं जाणाऱ्या बॉलवर झेपावत पकडला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

T20 World Cup PAK vs NZ: गोळीच्या वेगानं जाणाऱ्या बॉलवर झेपावत पकडला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

पाकिस्ताननं टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (Pakistan vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूनं एक अशक्य कॅच घेतला. त्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

 • Share this:
  शारजाह, 27 ऑक्टोबर: पाकिस्ताननं टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसरी मॅच देखील जिंकली आहे. मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये त्यांनी न्यूझीलंडचा (Pakistan vs New Zeland) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी त्यांचा बॅटर डेवॉन कॉनवेनं (Devon Conway Catch) एक अविस्मरणीय कॅच पकडत सर्वांचं मन जिंकलं. मिचेल सँटनरच्या बॉलवर पाकिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद हाफिजचा  (Mohammad Hafeez) हवेत झेपावत कॅच घेत त्यानं हा कॅच घेतला. ही मॅच पाहणाऱ्या प्रत्येकाचा क्षणभर या कॅचवर विश्वास बसला नाही. पाकिस्तानच्या इनिंगमधील 11  व्या ओव्हरमध्ये ही प्रकार घडला. सँटनरनं टाकलेला बॉल हाफिजनं लाँग ऑन आणि कव्हरमधून मारला होता. बंदूकीच्या वेगानं बाऊंड्रीच्या दिशेनं जाणाऱ्या त्या बॉलवर सँटनरनं झेप घेतली. त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या बॉलवर त्यानं फुल डाईव्ह मारत एक अशक्य वाटणारा कॅच पकडला.
  कॉनवेच्या या जबरस्त कॅचनंतर न्यूझीलंडचा पराभव टळला नाही. टॉस हरल्यानं पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या न्यूझीलंडला गप्टील आणि डॅरेल मिचेल या ओपनरनी चांगली सुरुवात करून दिली, पण यानंतर न्यूझीलंडची बॅटिंग गडगडली. मिचेल आणि कॉनवेने प्रत्येकी 27 रन आणि केन विलियमसनने 25 रन केले. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 134 रन केले. पाकिस्तानच्या हारिस राऊफने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. T20 World Cup: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध होणार 'करो वा मरो' मुकाबला, न्यूझीलंडने दिलेलं 135 रनचं आव्हान पाकिस्तानने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान काही काळ अडचणीत आलं होतं, पण आसिफ अलीने (Asif Ali) 12 बॉलमध्ये नाबाद 27 रन आणि शोएब मलिकने (Shoaib Malik) नाबाद 26 रन करून पाकिस्तानचा विजय सोपा केला. मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) सर्वाधिक 33 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोदीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
  Published by:News18 Desk
  First published: