मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहलीची होणार कॅप्टनपदावरून हकालपट्टी, वाचा काय आहे BCCI चा प्लॅन

विराट कोहलीची होणार कॅप्टनपदावरून हकालपट्टी, वाचा काय आहे BCCI चा प्लॅन

T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. बीसीसीआय लवकरच विराटला (Virat Kohli) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.

T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. बीसीसीआय लवकरच विराटला (Virat Kohli) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.

T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. बीसीसीआय लवकरच विराटला (Virat Kohli) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाचा कॅप्टन करण्यात आलं आहे. विराटनं टी20 इंटरनॅशनल प्रकारातील कॅप्टनसी सोडली आहे. त्यामुळे त्याच्या जागी रोहितची निवड होणार हे निश्चित मानलं जात होतं. ही औपचारिकता मंगळवारी पूर्ण करण्यात आली.

बीसीसीआय लवकरच विराटला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयनं अद्याप वन-डे टीमच्या कॅप्टनबद्दल काहीही सांगितलेलं नाही. पण, 2023 साली भारतामध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टी20 आणि वन-डे टीमचा एकच कॅप्टन असावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. त्यामुळे योग्यवेळी विराटला या वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवून रोहित शर्माला कॅप्टन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या वन-डे सीरिजपूर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 'वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून बीसीसीआय विराट कोहलीलाच कॅप्टन म्हणून कायम ठेवील याची मला खात्री नाही. याची शक्यता खूपच कमी आहे. विराट फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन असेल.' असे या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

आगामी काळात आयसीसीच्या 2 वर्ल्ड कप स्पर्धा आहेत.र पुढच्या वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात एक टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) होईल. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धांसाठी टीमची बांधणी करण्यासाठी रोहितला वेळ मिळावा यासाठी त्याला लवकरात लवकर कॅप्टन करण्यात येणार आहे.

IPL 2022: संजू सॅमसननं तोडलं राजस्थानशी नातं! 'या' टीममधील जागा पक्की?

टीम इंडियात मोठे बदल

न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये असलेले विराट कोहली, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि शार्दूल ठाकूर हे न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज खेळणार नाहीत. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल या नव्या चेहऱ्यांना टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

First published:

Tags: BCCI, Rohit sharma, Virat kohli