मुंबई, 13 नोव्हेंबर: पाकिस्तानची क्रिकेट टीम (Pakistan Cricket Team) टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. ग्रुप 2 मध्ये सर्व मॅच जिंकणाऱ्या पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियानं (Pakistan vs Australia) 5 विकेट्सनं पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये कॅच सोडणारा हसन अली (Hasan Ali) या पराभवानंतर पाकिस्तानी फॅन्सचा व्हिलन बनला आहे. हसन अलीच्या खराब फिल्डिंगवर सध्या टीका होत आहे. त्याचबरोबर त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यामध्ये तो रस्त्यावर वरातीमधला डान्स करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच हसन अली जोरदार ट्रोल होत आहे. एका युझरनं त्याला ट्रोल करताना याला ‘डान्स इंडिया डान्स’ कार्यक्रमात बोलवा, असा सल्ला दिला आहे. तर अन्य एका युझरनं हा हसनचा पार्ट टाईम जॉब असल्याचं सांगितलं आहे.
Man of the match bi #Hasan_Ali
— ZaBi Shaheen (@ZaBiShaheen2) November 11, 2021
that a performance pic.twitter.com/SyQyShmUQO
पाकिस्तानने सेमी फायनलवर पकड मजबूत केली होती, पण 19 व्या ओव्हरला झालेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला मॅथ्यू वेडने सिक्स मारण्यासाठी मोठा शॉट खेळला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या हसन अलीने (Hasan Ali) त्याचा कॅच सोडला. या बॉलला मॅथ्यू वेडने दोन रन काढत पुन्हा स्ट्राईक घेतली. यानंतर पुढच्या तिन्ही बॉलला सिक्स मारत वेडने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचवलं.
हसन अलीच्या या खराब फिल्डिंवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) चांगलाच नाराज झाला. हसननं सोडलेली कॅच हा मॅचचा टर्निंग पॉईंट होता, असं मत बाबरनं मॅच संपल्यानंतर बोलताना बाबरनं व्यक्त केलं. त्यानंतर सोशल मीडियावरही हसनवर टीका होत आहे. शोएबकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल सानियानं मांडली व्यथा, पाहा VIDEO