मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : वर्ल्ड रेकॉर्ड करणारा खेळाडू मैदानात अडखला, पुढे पाहा नेमकं काय घडलं, Video

T20 World Cup : वर्ल्ड रेकॉर्ड करणारा खेळाडू मैदानात अडखला, पुढे पाहा नेमकं काय घडलं, Video

T20 World Cup : नेदरलँड्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युएईच्या अयान खाननं वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याचवेळी आणखी एका कारणामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

T20 World Cup : नेदरलँड्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युएईच्या अयान खाननं वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याचवेळी आणखी एका कारणामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

T20 World Cup : नेदरलँड्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युएईच्या अयान खाननं वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याचवेळी आणखी एका कारणामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 17 ऑक्टोबर : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 16 ऑक्टोबर (रविवार) पासून सुरूवात झाली आहे.  या स्पर्धेत एकूण 16 देशांच्या टीम सहभागी झाल्या आहेत.  आहेत. वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी दोन मॅचेस खेळवण्यात आल्या. यातील पहिली मॅच श्रीलंका विरुद्ध नामिबिया तर दुसरी मॅच यूएई (संयुक्त अरब अमिराती) विरुद्ध नेदरलँड्स अशी झाली. पहिल्या मॅचमध्ये नामिबियानं विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर जिलाँगमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या मॅचमध्ये नेंदरलँड्सला विजयासाठी चांगला संघर्ष करावा लागला.या मॅचदरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड करणारा एक खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जाताना बाउंड्रीजवळ जोरात पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'टीव्ही 9 भारतवर्ष'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  काय घडला प्रकार?

  टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील क्वालिफाईंग राउंडच्या दुसऱ्या मॅचमध्ये यूएईने टॉस जिंकून अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यूएईने 20 ओव्हर्समध्ये नेदरलँडसमोर 112 रनचं टार्गेट ठेवलं. यूएईची बॅटिंग सुरू असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 16 वर्षांचा अयान अफजल खान स्ट्राईकवर होता. नेदरलँडचा बॉलर फ्रेड क्लासेनने ओव्हरमधील पाचवा बॉल टाकताच अयानने तो मिडऑफच्या बाजूला मारला. तिथे टॉप कूपरने त्याचा शानदार कॅच घेतला आणि अयान आऊट झाला.

  आऊट झाल्यानंतर अयान निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये जात होता. तो ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना बाउंड्रीच्या दोरीमध्ये पाय अडकून तो धपकन जमिनीवर पडला. त्याला पडलेलं पाहताच उपस्थित चाहते उभे राहिले आणि अयानकडे पाहू लागले.

  अयानला जास्त गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे तो लगेच उभा राहिला आणि मग ड्रेसिंग रूमकडे पळाला. अयानने नेदरलँडविरुद्धच्या मॅचमध्ये फक्त पाच रन्स केले असले तरी एक वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे. तो आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. तो 16 वर्षांचा आहे.

  11 वर्षांच्या मुलानं रोहितला केलं इम्प्रेस, पण हा मुलगा आहे तरी कोण? BCCI ने केला खुलासा

  दरम्यान, अगोदर बॅटिंग करून यूएईच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये आठ विकेटच्या बदल्यात 111 रन्स केले. मोहम्मद वसीमने 47 बॉलमध्ये सर्वाधिक 41 रन्स केले. प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या नेदरलँड्सची सुरुवातही फार चांगली झाली नाही. 14व्या ओव्हरपर्यंत त्यांनी 76 रन्ससाठी सहा विकेट गमावल्या होत्या. मात्र, स्कॉट एडवर्ड्स (नॉट आऊट 16), टिम प्रिंगल (15) आणि लोगन व्हॅन बीक (नॉट आऊट 4) यांनी चांगला खेळ करून नेदरलँड्सचा विजय निश्चित केला.

  First published:
  top videos

   Tags: Cricket news, T20 world cup 2022, UAE, Viral videos